दीपस्तंभ’ पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान
नंदुरबार(प्रतिनिधी)-नाट्य तथा सांस्कृतिक क्षेत्रातील ‘दीपस्तंभ’ हा पुरस्कार मिळणे म्हणजे अभिमानाची बाब आहे. सदर पुरस्कार आई, वडील व गुरुजन यांना समर्पित करतो. प्रामाणिकपणे धडपडणार्या लोकांच्या पाठीशी राहणे अत्यंत गरजेचे आहे. जिभाऊ करंडकची संपूर्ण समिती हि १४ वर्षांपासून प्रामाणिकपणे काम करीत आहे, असे मत प्राचार्य बी.एस.पाटील यांनी व्यक्त केले. ते ‘दीपस्तंभ’ वितरण कार्यक्रमाप्रसंगी मंचावरून बोलत होते.
गाडगेबाबा शैक्षणिक व सांस्कृतिक सेवा मंडळ शिंदे आयोजित राज्य पुरस्कृत शिक्षक जयदेव लिंबा पेंढारकर तथा जिभाऊ यांच्या स्मरणार्थ दि हस्ती को-ऑप.बँक लि. प्रायोजित हस्ती-जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या रंगमंचावरून दरवर्षी नाट्य, साहित्य, नृत्य, गायन, सामाजिक आदी क्षेत्रात भरीव कामगिरी करणार्या व्यक्तींना ‘दीपस्तंभ’ हा मानाचा पुरस्कार दिला जातो. यंदा सदर पुरस्कार सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण आदी क्षेत्रात गेल्या अनेक वर्षापासून काम करणारे प्राचार्य बी.एस.पाटील यांना छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह नंदुरबार येथे दि हस्ती को-ऑप बँक लि.चे चेअरमन कैलास जैन व बाळूमामाच्या नावानं चांगभलं फेम अभिनेता अक्षय टाक यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. यावेळी मंचावर एस.व्ही.एन.आय.टी.सुरतचे प्रा.डॉ.शिवानंद सूर्यवंशी, सिने स्टील टेलिव्हिजन मोशन फोटोग्राफर्स असो. मुंबईचे जनरल सेक्रेटरी अतुल राजकुळे, सिने दिग्दर्शक शाम रंजनकर, कृषी अधिकारी नंदकिशोर सूर्यवंशी, सिने निर्माता तथा सुप्रसिद्ध मूर्तिकार मनोज वसईकर, माजी उपप्राचार्य डॉ.राजेंद्र कासार, सामाजिक कार्यकर्ते प्रदिप सूर्यवंशी, परीक्षक डॉ.कुंदा प्रमिला निळकंठ, डॉ.प्रदिप सरवदे, आसेफ शेख (अन्सारी) यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना प्राचार्य बी. एस.पाटील म्हणाले कि सातत्याने १४ वर्षासापासून सुरु असलेली हि राज्यस्तरीय स्पर्धा हि जिल्ह्याच्या नाट्यचळवळीला गती देण्याचे काम करीत आहे.
प्रास्ताविक आयोजक नाट्यकर्मी नागसेन पेंढारकर यांनी केले. सूत्रसंचालन व आभार तुषार ठाकरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नागसेन पेंढारकर, मनोज सोनार, राजेश जाधव, आशिष खैरनार यांच्यासह राहुल खेडकर, काशिनाथ सूर्यवंशी, तुषार ठाकरे, हर्षल महिरे, पार्थ जाधव, कुणाल वसईकर, कुणाल वीर, संतोष कालेकर, गिरीश वसावे, जितेंद्र खवळे, हरीश हराळे, रत्नदीप पवार, सागर कदम, चिदानंद तांबोळी, प्रफुल्ल महिरे, जितेंद्र पेंढारकर, धर्मेंद्र भारती, केतन तांबोळी, हेमंत पेंढारकर, प्रफुल्ल महिरे, संदीप बांगड, तनिष्का पेंढारकर, सायली जुमडे आदींनी परिश्रम घेतले.