नवापूर तालुक्यात पहिल्यांदाच राज्यस्तरीय मंथन स्पर्धा परीक्षा 2025 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षेनां मार्गदर्शनपर ही मंथन स्पर्धा परीक्षा होत आहे. या स्पर्धे परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना भविष्यात विविध स्पर्धा परीक्षा तसेच नवोदय विद्यालय परीक्षा, स्कॉलरशिप परीक्षा व एकलव्य रेसिडेन्शिअल परीक्षा तसेच सैनिकी स्कूल परीक्षा या परीक्षांसाठी मंथन स्पर्धा परीक्षेचा खूप उपयोग होईल त्याचबरोबर नवापूर तालुक्यात पहिल्यांदाच ही स्पर्धा परीक्षा आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. कारण या मोबाईल वापरामुळे विद्यार्थी हा या स्पर्धा परीक्षांकडे दुर्लक्ष करत आहेत. त्या विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने या स्पर्धेकडे न्यायचे असेल तर यासारख्या स्पर्धा परीक्षा या नवापूर सारख्या ग्रामीण भागामध्ये होणे खूप गरजेचे आहे. आणि यावर्षी या परीक्षेसाठी विशेष करून जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांनी खूप चांगला सहभाग नोंदवला जवळ जवळ नवापूर तालुक्यांतून 350 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला ही परीक्षा इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जात असून मार्गदर्शनपर ठरत आहे. यासाठी मदत करणारे कौशल्य विकसन प्रशिक्षणार्थी यांनी पर्यवेक्षक म्हणून उत्तम काम पाहिले त्याचबरोबर यासाठी शिवाजी हायस्कूल नवापूर यांनी परीक्षा केंद्र म्हणून इमारत उपलब्ध करून दिले. त्याचबरोबर नवापूर तालुक्यातील उपक्रमशील शिक्षक परमेश्वर कल्याणे सर, राजेंद्र गावित, सर फुंदे सर, शरद गावित सर, रमेश गावित सर, देशमुख सर धरमदास गावित सर, दिनेश चव्हाण सर यांनी उत्तम सहकार्य केले.श