नंदुरबार(प्रतिनिधी)-नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ पार पडला. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी कॉपीमुक्तीची शपथ घेतली.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य पुष्पेंद्र रघुवंशी यांनी विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरणात परीक्षेला सामोरे जाण्याचे आवाहन करत मेहनतीतून भविष्यात आई-वडिलांचे व महाविद्यालयाचे नाव उज्वल करावे यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात कॉलेज जीवनात दोन वर्षात आलेले अनुभव व शिक्षकांचे मार्गदर्शन याविषयी चेतना चव्हाण, गायत्री पाटील, आनंद वळवी, सत्तरसिंग वळवी व साजिया शेख या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी ज्येष्ठ शिक्षक प्रा.डी.एस.नाईक, प्रा.शैलेंद्र पाटील, प्रा.राजेंद्र शेवाळे, प्रा.पंकज पाटील, प्रा.एन.एस.पाटील, प्रा.योगेश चौधरी, प्रा.मयूर ठाकरे, प्रा.संजय मराठे, प्रा.आरती तवर, प्रा.शीतल दोढे , प्रा.कोकीळा बंजारा, प्रा.जयश्री भामरे आदी उपस्थित होते.