नवापूर-लाईट बाजार येथील भारत स्टोर्स पासून ते कायदावाला यांच्या घरा दरम्यान मेनरोडवर गतिरोधक (स्पीड ब्रेकर) बसविणे बाबत चे निवेदन लाईट बाजार येथील राहणारे रहीवासी यांनी मुख्यधिकारी अविनाश गांगुडे यांना दिले आहे
नवापूर लाईट बाजार भागातील कायमचे रहीवासी आहे. नवापूर शहरातील लाईट बाजार मेनरोड येथील भारत स्टोर्स ते कायदा वाला यांच्या घरापर्यंत नेहमी लहान मोठे अपघात होत असतात त्यामुळे सदर ठिकाणी स्पीड ब्रेकर बसविणे गरजेचे आहे
तसेच सदर ठिकाणी जड वाहनांची व लोकांची वर्दळ राहते त्यामुळे सदर टिकाणी स्पीड ब्रेकर (गतिरोधक) बसविण्यात यावे जेब्रा क्रासींगसह जेणे करुन त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे अपघात होणार नाही तरी कार्यवाही होणेस विनंती असे निवेदना मध्ये म्हटले आहे निवेदनावर लाईट बाजार येथील राहणारे स्थानिक रहीवासी व व्यापार तोसफ शेख,ईकबाल मन्सुरी,सुनिल वसावे,युनुस हवेलीवाला, प्रशात छञीवाला,मय्येक अग्रवाल,
इमत्याज वालोडीया,विशाल वालेछा,सुर्यभान पाटील,कैलास अग्रवाल,मनोज खिलवाणी,मुस्तफ मेमन,युसुफ कायदावाला,मोहम्मत कायदावाला,
सलिम मनियार,रऊफ मनियार,सह असंख्य व्यापारी बांधवाचा सह्या आहेत.