प्रसारक संस्था नवापूर संचलित खडकी (ता. नवापूर) येथील माध्यमिक विद्यालयात मानव विकास मिशन योजना कार्यक्रम अंतर्गत शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थीनींना मोफत सायकल वाटप व पालक मेळावा झाला.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बकाराम सुर्यवंशी, पंचायत समिती माजी सदस्य लताबाई गावीत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा (पालक) चंपाबाई भिल, शाळेचे मुख्याध्यापक अशोक निकम व्यासपीठावर उपस्थित होते. या वर्षी अकरा मुलींना मानव विकास मिशनअंतर्गत विनामूल्य सायकल वाटप करण्यात आल्या.याप्रसंगी पालक मेळावा झाला. दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. बकाराम सूर्यवंशी, विनायक सूर्यवंशी, मुख्याध्यापक अशोक निकम यांनी मार्गदर्शन केले. मनोज मराठे यांनी सूत्रसंचालन केले तर महेंद्र
पाटील यांनी आभार मानले, कनिष्ठ लिपिक रोशन
गावीत यांनी नियोजन केले. यावेळी विद्यार्थी पालक
उपस्थित होते.