शहादा तालुक्यात उद्योगधंद्यांना चालना देण्यासाठी पंचायत समितीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. महसूल विभागाकडून मोहिदा येथे 150 हेक्टर जागा उद्योगांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
पायाभूत सुविधांवर भर--
या जागेवर वीज , पाणी महामार्ग व रेल्वे मार्ग यांसारख्या आवश्यक सुविधांबाबत चर्चा झाली. तसेच गुजरात व मध्यप्रदेशच्या सीमावर्ती भागात असल्याने येथे उद्योगांना मोठी संधी उपलब्ध होणार आहे.
बैठकीतील चर्चेवर एक दृष्टिक्षेप :
✅ औद्योगिक वसाहतीसाठी 150 हेक्टर जागा निश्चित
✅ वीज, पाणी आणि वाहतुकीच्या सोयीसाठी नियोजन
✅ कच्चा माल आणि बाजारपेठ सहज उपलब्ध
✅ कुशल आणि अकुशल कामगार उपलब्धतेवर चर्चा
अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी सांगितले:
“शहादा तालुक्यात MIDC निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.”
👥 उपस्थित मान्यवर:
➡️ अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे
➡️ शहादा उपविभागीय अधिकारी कृष्णकांत कांवरिया
➡️ शहादा तहसीलदार दीपक गिरासे
➡️ गटविकास अधिकारी विकास राठोड
➡️ नायब तहसीलदार शैलेंद्र गवते
➡️ पंचायत समितीचे कार्यालयीन प्रशासन अधिकारी रवींद्र कुलकर्णी
➡️ मंडळ अधिकारी मुकेश चव्हाण
➡️ व्यावसायिक व उद्योजक – शरद पाटील, नरेश संचेती, पारस जैन, किशोर पाटील, दिनेश गोयल, अजय बाफना
🌟 शहादा औद्योगिक हब बनणार का? आपला अभिप्राय कमेंटमध्ये नोंदवा!