स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने मरणोत्तर नेत्रदान बरोबर आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम
नवापूर प्रतिनिधी
आदिवासी सेवा सहाय्यक व शिक्षण प्रसारक संस्थेचे श्री स्वरूपसिंग हिऱ्या नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालय आणि उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी रक्त तपासणी शिबिराचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले होते.
सर्व प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करणे आणि त्यांच्या आरोग्याची योग्य तपासणी करणे या उद्देशाने हे शिबिर आयोजित केले होते. या शिबिरासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र वावडी येथील प्रयोगशाळा तंत्रज्ञ डॉक्टर हरिश्चंद्र सूर्यवंशी यांनी रक्त तपासणी करून घेतली. तसेच विद्यार्थिनींच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी किती महत्त्वपूर्ण आहे यावर मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
या शिबिरात 55 राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी सहभाग घेतला.
या शिबिरात प्राचार्य डॉ संजय अहिरे यांनी मुख्यतः रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी, व्हिटॅमिन डी चाचणी आणि अन्य रक्तविकारांची तपासणी आपल्या आयुष्यात निरोगी राहण्यासाठी महत्त्वाची आहे असे प्रतिपादन केलें. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य डॉ. संजय अहिरे, डॉ.जगदीश काळे, डॉ.मंदा मोरे, डॉ. गौरी पाटील, प्रा फिलिप गावित उपस्थित होते. या शिबिरात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे संचालक डॉक्टर सचिन नांद्रे, जिल्हा समन्वयक डॉ. विजय पाटील,विभागीय समन्वयक डॉ.अमोल भुयार यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ. नितीनकुमार माळी यांनी तर आभार प्रा फिलिप गावित यांनी मानले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बी.एड महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षिका यांनी प्रयत्न केले.