Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

शहाद्यात आयुर्वेदिक औषध कारखान्यावर अन्न व औषध प्रशासनाची धाड

शहादा येथील खेतिया रस्त्यावरील मलोणी शिवारात विनापरवाना आयुर्वेदिक औषधांची निर्मिती करणाऱ्या पायके हेल्थकेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने छापा टाकून संबंधित कारखान्याची कागदपत्रांची तपासणी,औषध निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या साहित्याची , तसेच कच्च्या व पक्क्या मालाची उशिरापर्यंत तपासणी करून जप्त केली आहेत.   दरम्यान ,यातील हेवी मशिनरी कारखान्यावरच सील करण्यात आली असून उर्वरित साहित्य तयार आयुर्वेदिक औषधी व व कच्चामाल अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतला आहे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून तपासांती संबंधितांवर गुन्हे दाखल करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले या घटनेमुळे शहादा शहरात खळबळ उडाली आहे शहादा खेतिया स्त्यावरील आयडियल स्कूलच्या समोर एका इमारतीच्या पाठीमागे असलेल्या एका पक्क्या घरातील पत्र्याच्या शेडमध्ये विनापरवाना औषधांची निर्मिती होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाचे नाशिक येथील सहाय्यक आयुक्त संदीप देवरे, धुळे येथील औषध निरीक्षक किशोर देशमुख, सहायक मंगेश भावसार नंदुरबार येथील सौरभ देवकर यांच्या पथकाने काल दिनांक 30 रोजी अचानक छापा टाकला. सदर ठिकाणी मोठ्यप्रमाणावर आयुर्वेदिक औषधांची निर्मिती करण्यात येत होती. यात क्लब ड्रीम आयुर्वेदिक चूर्ण पावडर ,गोल्डन नाईट चवनप्राश आणि शक्ती वर्धक औषधी निर्मित केली जात होती पथकातील अधिकाऱ्यांनी याबाबत संबंधित कारखाना चालकाला संपर्क साधून घटनास्थळी बोलाविल्यानंतर तो पुणे येथे असल्याचे सांगण्यात आले त्याच्या ऐवजी कारखान्याचा मॅनेजर आणि शेड मालक उपस्थित झाला त्याच्याकडून औषध निर्मितीचा परवाना व इतर आवश्यक राज्य शासनाकडून मिळालेल्या परवाना तसेच कागदपत्रांची मागणी केली. मात्र, संबंधितांनी देण्यास असमर्थता व्यक्त केली. यावेळी 
संबंधित कारखाना चालकाने पथकातील अधिकाऱ्यांना पदार्थाच्या उत्पादन करीता औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० व नियम १९४५ नुसार आवश्यक असलेल्या परवान्या बाबत विचारणा केली असता त्यांनी सदर जागे मध्ये कुठलाही परवाना मंजूर नसल्याचे सांगितले. या कारखान्यांमध्ये चवनप्राश व इतर शक्तीवर्धक आयुर्वेदिक हेल्थकेअर उत्पादनांची निर्मिती पुणे येथील एका कंपनीमार्फत केली जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांना संबंधितांकडून देण्यात आली .  दुपारी दोन वाजेच्या सुमारास सुरू झालेली ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. कारवाई पूर्ण झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी कारखान्यात असलेली अवजड मशिनरी कारखान्यातच सील केली त्यानंतर औषधी भरण्यासाठी असलेले प्लास्टिकचे लहान-मोठे डबे, विक्रीयुक्त तयार झालेली चूर्ण व चवनप्राश आणि औषधांकरिता लागणारा कच्चामाल आणि अन्य साहित्य ताब्यात घेतला आहे दरम्यान, याबाबत अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित औषधी कच्चामाल प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आला असून त्यानंतर व अन्य तपासाची प्रक्रिया पूर्ण करून गुन्हे दाखल केले जातील.आयुर्वेदिक चव्यनप्राश २५ हजार रुपयांचे चूर्ण ,पाच हजार ५००रुपयांचे  आयुर्वेदीक चूर्ण व तयार केलेले पदार्थ ,कच्चा माल व इतर सामुग्री  व मशिनरी १० लाख रुपये अशी विविध सामुग्री सीलबंद करुन जागेवर ठेवली आहे . तर कारवाई नंतर काही नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल. अशी माहिती सहाय्यक आयुक्त संदीप देवरे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.