विद्यार्थी माता पालकांनी स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून लावले स्टॉल-- विविध खाद्यपदार्थांचे केले सादरीकरण----@
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच त्यांचा शारीरिक विकास देखील महत्त्वाचा आहे. त्यासाठीच शाळेत पोषण आहारही देण्यात येतो. आता प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत पाककृती स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे त्या अनुषंगाने नवापूर येथील श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात प्रधानमंत्री पोषणशक्ती योजनेअंतर्गत पाककृती स्पर्धा उत्साहात संपन्न झाली-पाककृती स्पर्धेचे उद्घाटन नवापूर केंद्राचे केंद्र प्रमुख शैलेश राणा यांच्या हस्ते झाले यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका कमल कोकणी, उपमुख्याध्यापक ए.एन. सोनवणे,ज्येष्ठ शिक्षक अशोक रजाळे, छात्रालय प्रमुख राकेश भंगाळे उपस्थित होते. यावेळी ११ विद्यार्थी माता पालकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवून स्टॉल लावले होते व विविध प्रकारच्या खाद्यपदार्थाचे मेनू तयार करून सादरीकरण केले. यात शाळेच्या तीन महिला शिक्षिका कल्पना वसावे, वैशाली पाटील, गायत्री पाटील सहभाग नोंदवला. केंद्रप्रमुख शैलेश राणा सर यांनी स्पर्धेतील विविध खाद्यपदार्थाची चव घेऊन पाहणी केले. माता पालकांशी संवाद साधत माहिती जाणून घेतली. व मार्गदर्शन केले तसेच खाद्यपदार्थाचे कौतुक करून समाधान व्यक्त केले. स्पर्धेत कल्याणी विजय गोसावी, यशोदीप विजय गोसावी,किंजल दर्शन पाटील, मनीषा शरदचंद्र पाटील, सुप्रिया शरदचंद्र पाटील, मीना प्रताप नाईक, प्रिया प्रताप नाईक, हर्षदा विजय मावची यांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला. शाळेच्या उपशिक्षिका कल्पना वसावे मॅडम यांनी वाफेवरच्या तांदूळच्या भाकरी व चटणी हे पदार्थ स्पर्धेत सादर केले होते. तर वैशाली पाटील यांनी पावभाजी, तर गायत्री पाटील यांनी व्हेज पुलाव व सलाद हे पदार्थ सादर केले होते.
विद्यार्थ्यांना शालेय जीवनात तृणधान्ययुक्त आहाराची सवय लावणे आवश्यक आहे. याकरिता विविध पाककृतींचा समावेश दैनंदिन आहारामध्ये केल्यास मुलांना वेगळेपणा मिळेल व हा आहार विद्यार्थी आवडीने खाऊ शकतील. यातून मुलांचे आवश्यक शारिरिक पोषण होईल, याच हेतूने ही पाककृती स्पर्धा उपयुक्त ठरेल असे प्रतिपादन केंद्र प्रमुख शैलेश राणा यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.