नवापूर प्रतिनिधी
खादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते. पाककृती मधील वेगवेगळे पदार्थ पाहून सुंदर असे वातावरण तयार होत असते त्या अनुषंगाने जिल्हा परिषद गुजराती स्टेशन शाळा नवापूर येथे प्रधानमंत्री पोषणशक्ती योजनेअंतर्गत पाककृती स्पर्धा आयोजन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांच्या पालकांनी वेगवेगळे असे पाक मेनू तयार करून स्टॉल लावण्यात आले व त्या मध्ये बरेचसे वेगवेगळे पदार्थ मेथीचे भजिया,शेव मुरमुरे भेळ, तसेच चना मसाला, दाळवडे, पोंगे बटाटे असे विविध पदार्थ,पाणीपुरी बनवून विद्यार्थ्यांना या स्पर्धा अंतर्गत सर्व छानसे पदार्थ बनविण्यात आले.सदर कार्यक्रमासाठी नवापूर बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी किशोर रायते व सोबत केंद्राचे केंद्रप्रमुख शैलेश राणा यांनी उपस्थिती देऊन पाककृती स्पर्धेचे उद्घाटन करून चव घेऊन समाधान व्यक्त कले. या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद गुजराती शाळेचे शिक्षक भाविन जगताप, संदीप राणा, व एलिशिबा गावित व पालक वर्ग व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.