Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

अग्निशमन वाहन व रुग्णवाहिका तसेच आधुनिक शववाहिनीची सामाजिक कार्यकर्ता उमेश बापू पवार‌ यांची खासदारांकडे मागणी..

नवापूर प्रतिनिधी
नवापूर नगरपरिषदेसाठी अग्निशमन वाहन व रुग्णवाहिका तसेच आधुनिक शववाहिनीची मागणी सामाजिक कार्यकर्ता उमेश बापू पवार‌ यांनी खासदार गोवाल पाडवी यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली आहे
नवापूर नगरपरिषद हद्दीतील रहिवासी व नागरिक केलेल्या मागणीनुसार मागील अनेक वर्षांपासून शहरात आग लाण्याच्या घटना घडलेल्या असून त्यात वृध्दी झालेली आहे. नगरपरिषदेकडे एक अग्निशमन वाहन असून ते पुरेसे नाही. त्यामुळे आग लागल्याची घटना झाल्यास आग विझवणे शक्य होत नाही. तसेच सदर वाहनाचे पाणी संपल्यास पुन्हा त्याच वाहनात पाणी भरुन सदर घटनेच्या ठिकाणी येण्यास वेळ लागतो आणि एकच अग्निशमन वाहन असल्यामुळे आग आटोक्यात न आल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान होते. शहरात नागरिकांची संख्या वाढल्याने घरांच्या संख्येत देखील झपाट्याने वाढ झालेली आहे. अनेक ठिकाणी लहान-मोठ्या वस्त्या,दाट वस्त्या निर्माण झालेल्या आहेत. काही ठिकाणी घरे हे सोबतच असल्याने, एकाला लागून एक सलग असल्याने अशा ठिकाणी आग लागल्यास मोठ्या प्रमाणात आगीचा तांडव होतो यात घरासोबत संसारोपयोगी साहित्याचे देखील नुकसान होते व या आगीत सर्वच जळून खाक होते. दुर्दैवाने झालेल्या नैसर्गिक घटनेस जबाबदार कोणी नसते पण झाल्यास योग्य ती यंत्रणा राहिल्यास मोठी घटना होण्या पुर्वीच नियंत्रण मिळवू शकतो म्हणून एक अग्निशमन वाहनाची शहरात अत्यंत आवश्यकता आहे.तसेच नवापूर नगर परिषदेकडे रुग्णवाहिका (Ambulance) व शववाहिनीची देखील अत्यंत‌ आवश्यकता आहे. महोदय खऱ्या अर्थाने हा विषय अतिशय संवेदनशील आहे. रुग्णवाहिका व‌ शववाहिनी हे नवापूर नगरपरिषदेकडे नसून ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. नवापूर शहरात व सध्याचे वातावरण पाहता रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे व रुग्णवाहिका नसल्याने रुग्णास आवश्यक त्या इस्पितळात घेऊन जाणे जिकरीचे होत असते व या असुविधेमुळे अनेक रुग्णांना आपला जीव देखील गमवावा लागलेला आहे. आपल्या स्तरावरुन योग्य ती कार्यवाही होऊन नवापूर शहरासाठी एक अग्निशमन वाहन, रुग्णवाहिका व शववाहिनीची उपलब्धता करुन मिळावी असे निवेदनामध़्ये म्हटले आहे. निवेदनावर सामाजिक कार्यकर्ता उमेश बापू पवार,कुणाल नरभवन,विरसिंग कोकणी,अतुल मावचीं,अनुप गावीत,साहिल सैय्यद,रोहन पवार,अभास शेख,बिलाल शेख,राजुव खान,हमजा मकरानी आदीचा सह्या आहेत

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.