Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

गांजा बाळगणा-याविरुध्द स्थानिक गुन्हे शाखा व शहर पोलीस ठाणे यांची संयुक्त कारवाई..

एकुण 3 लाख 38 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त....!
 नंदुरबार शहरातील कोम्बींग ऑपरेशन दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. हेमंत पाटील यांना गोपनिय माहिती मिळाली की, कंजरवाडा परिसरात सुदाम तिळंगे हा घरात बेकायदेशीररित्या गांजा कब्जात बाळगुन आहे, अशी माहिती मिळाली. त्याअन्वये नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.श्रवण दत्त.एस यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी श्री. हेमंत पाटील, पोउपनि - श्री. मुकेश पवार, व
पथक तसेच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. अमितकुमार मनेळ व पो. ठाणे पथक यांचे मदतीने कारवाई करणेकामी रवाना झाले.
स्थानिक गुन्हे शाखा व शहर पोलीसांचे पथक मिळालेल्या गोपनीय बातमीप्रमाणे शहरातील कंजरवाडा परिसरातील इसम नामे सुदाम तिलंगे याचे घराजवळ जाऊन सदर इसमास आवाज देऊन बाहेर बोलाविले असता तोबाहेर आला त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव सुदाम रमेश तिलंगे, वय- 56 वर्षे, रा. कंजरवाडा, नंदुरबार असे सांगितले. सदर वेळी त्याचे घराची झडती घेतली असता घरात एका कोप-यातील गोणीत उग्रवासाचा सुका गांजा प्रकारातील अंमली पदार्थ मिळून आला. सदर इसमाचे कब्जातुन एकुण 16 किलो 900 ग्रॅम वजनाचा 3,38,000/- रुपये किमतीचा सुका गांजा मिळून आला असून सदरचा मुद्देमाल गुन्ह्याच्या पुढील तपासकामी योग्य ती सर्व कायदेशीर प्रक्रिया करुन ताब्यात घेण्यात आला आहे. सदर इसम नामे सुदाम रमेश तिलंगे याचे विरुध्द शहर
पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 74 / 2025 गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम- 1985 चे कलम 8(क), 20, 22 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पो. उपनिरीक्षक श्री. स्वप्नील पाटील करीत आहेत.सदरची उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस पथकाचे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त.एस, अपर पोलीस अधीक्षक श्री. आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, नंदुरबार उपविभाग श्री. संजय महाजन, यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.