शेतकरी स्वतः शहरी भागात जाऊन करत आहेत स्ट्रॉबेरी विक्री...
:- नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागात असलेल्या डाब परिसरात आदिवासी शेतकरी घेत आहेत स्ट्रॉबेरीचे उत्पन्न उत्पन्न निघाल्यानंतर स्वतः शेतकरी शहरी भागात स्टॉल लावून स्ट्रॉबेरी विक्री करत आहेत यामुळे शेतकऱ्यांना चांगला फायदा होताना दिसून येत आहे सध्या अक्कलकुवा शहर परिसरात शेतकरी 200 रुपये किलो प्रमाणे स्ट्रॉबेरी विकत आहेत तसेच गुजरात राज्यातील सुरत येथे बाजारपेठेत देखील स्ट्रॉबेरीचे निर्यात करीत आहेत. दुर्गम भागातील शेतकरी गुलाबसिंग पाडवी यांनी आपल्या दोन एकर क्षेत्रात स्ट्रॉबेरीची लागवड केली होती गुलाबसिंग यांना दोन एकर शेतात 2 लाखाचा खर्च लागला असून यांना त्यांना आठ ते दहा लाखाच्या उत्पन्न मिळणार असल्याचे अंदाज आहे. शेतकऱ्यांनी पारंपारिक शेतीवर अवलंबून न राहता नवनवीन प्रयोग करत आधुनिक शेतीकडे वाटचाल करून आपली आर्थिक प्रगती करणे आता काळाची गरज असल्याचे शेतकरी गुलाबसिंग पाडवी म्हणत आहेत....