अक्कलकुवा येथील मदरसात विनापरवानगीने अवैधरित्या राहत असलेल्या नागरिकांची चौकशी करून कडक कार्यवाही करा तसेच एका दलित युवतीला जाळ्यात फसवुन तिचे अश्लिल व्हिडीओ बनवुन तिला ब्लॅकमेल करण्यात येत होते अशा शहराची शांतता भंग करणाऱ्याचा बंदोबस्त करा या मागणीसाठी आज राष्ट्रीय सुरक्षा मंच शहादा मार्फत प्रांत अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की,अक्कलकुवा येथील मदरसा जामिया ईस्लामिया ईशातुल ऊलुम संस्था येथे विदेशी नागरिक खालीद इब्राहिम सालेह अल खदामी ही व्यक्ती व्हिसा व पासपोर्ट मुदत संपल्या नंतरही संस्थेत बिनधास्त निवास करीत होती व विनापरवानगीने अवैधरित्या राहत होते . यासाठी संस्था चालक हे त्यास राहू देऊन अभय देत होते. या सर्व गोष्टी बेकायदेशीर रित्या व अवैधरित्या संस्थेत सुरु होत्या.
या परिस्थितीत संस्थेत होणारे नागरिकांचे व्यवहार, संस्थेचे व्यवहार, संस्थेचे आर्थिक व्यवहार, संस्थेच्या उभ्या असलेल्या इमारती, त्यासंबंधीचे कागदपत्रांची पडताळणी, अक्कलकुवा तालुक्यातील जनजाती समाजातील स्थावर मिळकतींच्या हस्तांतरणास बंदी असतांना संस्थेच्या नावे एवढ्या जमीनी हस्तांतरीत कशा झाल्यात? ह्या विषयी शासनाने विषेश समिती गठन करुन संस्थेची सखोल चौकशी करणे अनिवार्य आहे.बिदेशी नागरिकांना बेकायदेशिरपणे वास्तव्य देणे व संरंक्षण हे देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने घातक आहे. या विदेशी नागरीकाला भारताचे नागरीकत्व मिळवून देण्यासाठी कागदपत्र कसे उपलब्ध झाले, त्यासाठी त्याला कोणी मदत केली व यासाठी सहकार्य करणाऱ्यांवर सुद्धा कायदेशीर कारवाई करण्यात यावी .काही दिवसांपुर्वी शहादा शहरात एका आदिवासी महिलेची भर दिवसा चाकु मारुन हत्या करण्यात आली. चाकु मारणारी व्यक्ति ही सुद्धा महाराष्ट्रातील नव्हती. तसेच आताच एका दलित युवतीला जाळ्यात फसवुन तिचे अश्लिल व्हिडीओ बनवुन तिला ब्लॅकमेल करण्यात येत होते. अशा शहराची शांतता धोक्यात टाकणाऱ्या घटना शहादा शहरांत वारंवार घडत आहे हे सुद्धा घातक आहे.शहादा शहरात आपण बाहेरुन आलेल्या व्यक्तिंची चौकशी करुन त्यांच्या कागदपत्राची सखोल पडताळणी करावी. यावेळी राष्ट्रीय सुरक्षा मंचचे पदाधिकारीसह सदस्य उपस्थित होते-... शहादा तालुका प्रतिनिधी कैलास सोनवणे