शिवपार्वती विवाह सोहळा ठरला सर्वांचे आकर्षण-झाला लक्षवेधी..!!
श्री शिवाय नमस्तुभ्यं: , हर हर महादेव अश्या गजरात महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या आनंदात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. शहरातील मंगलदास पार्क येथील श्री विघ्नहर्ता सांस्कृतिक व क्रीडा आणि बहुउद्देशीय मंडळ, मंगलदास पार्क नवापूर संचलित
श्री विघ्नहर्ता महादेव व हनुमान मंदिरात महाशिवरात्री निमित्ताने २६ फेब्रुवारीच्या दिवशी दिवसभर धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. या दिवशी विशेष प्रमुख कार्यक्रम सायंकाळी
शिवपार्वती विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यात शहरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सकाळचे कार्यक्रम संपन्न झाले
श्री विघ्नहर्ता महादेव मंदिरात पहाटे पाचला सामूहिक शिववृद्राभिषेक करण्यात आला.यात अनेक भाविक सहभागी झाले. सकाळी सातला ध्वजारोहण करण्यात आले. महाआरती करण्यात आली.दुपारी तीन वाजेपासून कार्यक्रमाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.शिवपार्वती विवाह सोहळा संपन्न झाला.दुपारी तीन वाजता शिवपार्वती यांना हळद लावण्यात आली .दुपारी साडेतीनला मेहंदीचा कार्यक्रम सुरू झाला.दुपारी साडेचारला शिव पार्वती श्रृंगार करण्यात आला.सायंकाळी सहाला
शिवपार्वती शोभायात्रा वाजंत्रीसह वर घोडा श्री साई मंदिरापासून काढण्यात आला. रात्री आठला शिवपार्वती विवाह सोहळा साजरा झाला. महाआरती करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या विवाह सोहळ्यात शहरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन श्री विघ्नहर्ता सांस्कृतिक व क्रीडा आणि बहुउद्देशीय मंडळ, मंगलदास पार्क नवापूर यांनी केले. शिवपार्वती विवाह सोहळा निमित्ताने महादेव मंदिर व हनुमान मंदिर आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांनी सजावट करण्यात आली होती. विवाह सोहळ्याला व संपूर्ण कार्यक्रमात परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती