मुघलांना सळोकीपळो करून सोडणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती. मराठा साम्राज्याची स्थापना करणारे महान योद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती १९ फेब्रुवारी रोजी साजरी केली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथा इतिहासाच्या पानांवर नोंदल्या गेल्या आहेत, ज्याची संपूर्ण देशाला जाणीव आहे. आज शिवाजी महाराजांची ३९५ वी जयंती साजरी केली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती महाराष्ट्रासह देशाच्या इतर भागातही साजरी केली जाते. त्या अनुषंगाने आज श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत, लोककल्याणकारी ,रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती निमित्त त्रिवार मानाचा मुजरा करून अभिवादन करण्यात आले. महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. त्यानिमित्त अभिवादनाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला प्राचार्या कमल कोकणी, उपमुख्याध्यापक ए एन सोनवणे, उपप्राचार्य राजेंद्र कुलकर्णी, पर्यवेक्षक जी.डी सूर्यवंशी यासह माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील उपस्थित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोष करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करून उजाळा देण्यात आला. यावेळी माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.