दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात.अत्यंत कडक व कॉफीमुक्त वातावरणात परीक्षार्थींनी दिला मराठीचा पेपर
परीक्षा केंद्रात सीसीटीव्ही तसेच मोबाईल द्वारे चित्रीकरणाची नजर..!
आज दिनांक 21 फेब्रुवारीपासून इयत्ता दहावी परीक्षेला सुरुवात झाली. नवापूर शहर व तालुक्यात कॉपीमुक्त परीक्षा पार पाडण्यासाठी परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही द्वारे व ज्या ठिकाणी सीसीटीव्ही नसतील त्या ठिकाणी मोबाईल द्वारे झूम चित्रीकरण करण्यात येत असून केंद्राच्या गेटमधूनच तपासणी करून परीक्षार्थींना परीक्षा केंद्रात सोडले जात आहे. पालकांना परीक्षा केंद्राच्या बाहेर उभे करून फक्त परीक्षार्थी यांना प्रवेश देण्यात आला आहे.यासह परीक्षा केंद्राच्या 200 मीटरच्या आत झेरॉक्स सेंटर तसेच 100 मीटरच्या आत पालकांना येण्यास बंदी करण्यात आली आहे कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी प्रशासनाच्या वतीने सम्पूर्ण तयारी करण्यात आली आहे. दहावीच्या आज मराठीचा पेपर विद्यार्थ्यांनी दिला तत्पूर्वी विद्यार्थी परीक्षेला जाताना गोंधळात दिसून येत होते परीक्षा दिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसून आला प्रथमच दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेला विद्यार्थी सामोरे गेल्याने वेगळाच अनुभव मिळाल्याचे त्यांनी सांगितले. दहावीच्या 21 हजार 765 परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी 50 परीक्षा केंद्राची सोय करण्यात आली आहे. 15 केंद्र संवेदनशील म्हणून निश्चित करण्यात आली असून या ठिकाणी कॉपी रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहे.