नवापूर.(प्रतिनिधी) माणिकराव गावित व जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते सुरुपसिंग नाईक यांनी मोठ्या परिश्रमाने उभ्या केलेल्या आदिवासी सहकारी साखर कारखाना.. गेल्या काही महिन्यांपूर्वी नवापूर विधानसभा संपन्न झाल्या त्यात मुख्य मुद्दा साखर कारखाना होता .. साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन भरत माणिकराव गावित यांच्यावर कारखान्यात भ्रष्टाचार केल्याचा आरोप करून विधानसभा निवडणूक तपविण्यात आल्या. त्यात विरोधकांना काही अंशी यश पण आले...विरोधकांनी सहकार आयुक्त यांच्या कडे तक्रारी दाखल करून दिनांक २६ नोव्हेंबर २०२४ रोजी कारखान्याची संचालक मंडळ समिती निषप्रभावित करून त्या ठिकाणी प्रशासक समिती सहकार विभागा मार्फत नेमण्यात आली..मात्र ते म्हणतात ना.. सत्य परेशान हो शकता हे .मगर पराजित नहीं..कारखान्याचा परिसरात असलेल्या आई देवमोगरा मातेच्या मंदिराचे सुशोभीकरण, कारखान्याचे कर्मचारी यांच्या वेतन व इतर काही मुद्द्यावरून कारखान्याचा संचालक मंडळावर आरोप करण्यात आले मात्र सहकार व पणन विभाग यांनी सदर विषयांवर चौकशी केली असता केलेल्या आरोपांवर कुठल्याही प्रकारचे तथ्य नसल्याचे त्यांचा निदर्शनास आले व मा.सहकार आयुक्त यांनी तात्काळ १३ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रशासक समितीस स्थगिती देऊन कारखान्याचा संपूर्ण पदभार संचालक मंडळास सुपूर्द करण्यात आले..
त्या अनुषंगाने आज दिनांक १४ फेब्रुवारी रोजी कारखान्याचे चेअरमन भरत गावित यांनी पत्रकार परिषद घेऊन झालेल्या आरोपात कुठल्याच प्रकारचे तथ्य न आढल्यामुळे मंत्री सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग यांनी कारखाना पुनश्च संचालक मंडळाचा स्वाधीन केला व कारखाना पूर्ववत सुरू करण्यास शासन सर्वोतोपरी सहकार्य करेल असे आश्वासन देण्यात आल्याचे स्पष्ट केले तसेच येणाऱ्या काळात कारखाना सुयोग्य रित्या व सुरळीत सुरू करून माणिकराव गावित व ज्येष्ठ नेते सुरूपसिंग नाईक यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करेल . व माझ्या शेतकरी बांधवांवर कुठल्याच प्रकारे अन्याय होऊ देणार नाही असे आश्र्वासन भरत गावीत यांनी पत्रकार परिषदेतून दिले