“लवकर निदान,योग्य उपचार कर्करोगमुक्त जीवनाचा अंगिकार ..!!
आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा शासकीय रुग्णालय व संपूर्ण जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या वतीने जागतिक कर्करोग दिन या निमित्ताने जनजागृती फेरी, स्वाक्षरी मोहीम आणि आरोग्य जनजागृतीचे विविध उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडले.या महत्वपूर्ण उपक्रमांचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते करण्यात आले.
“कर्करोग विरुद्ध लढा. आरोग्यासाठी एकजूट” या संकल्पनेवर लोकसहभागातून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमाला
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र सोनवणे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, विद्यार्थी आणि समाजातील विविध घटक यांचा मोठा सहभाग होता
उपक्रमाचे वैशिष्ट्ये :-- जनजागृती फेरी : परिसरात काढण्यात आलेल्या फेरीत नागरिकांनी कर्करोगाविषयी महत्त्वपूर्ण संदेश दिले.
स्वाक्षरी मोहीम --: कर्करोगविरोधी लढ्यासाठी प्रतिज्ञा..!
कर्करोगाविषयी तज्ज्ञांचे मार्गदर्शन व आरोग्य तपासणी शिबिरे : लोकांनी आरोग्य तपासणी करून घ्यावी हा मुख्य उद्देश--
या उपक्रमातून नागरिकांमध्ये कर्करोगासंबंधी जागरूकता निर्माण होऊन, “लवकर निदान आणि योग्य उपचार” यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
चला, एकत्र येऊन कर्करोगा विरोधात जनजागृती करू आणि निरोगी जीवनाची दिशा दाखवू!