Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

राज्य शुटींगबॉल स्पर्धेत धुळे, सोलापूर,अहिल्यानगर, संभाजीनगर संघाला विजेतेपद

नंदुरबार(प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्य शुटींगबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने व नंदुरबार जिल्हा शुटींगबॉल असोसिएशन यांच्यावतीने आयोजित स्व.प्रेमदास कालू यांच्या स्मरणार्थ ३८ वी महाराष्ट्र राज्य शूटिंगबॉल अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा २०२४-२५ चे सबज्युनियर व जुनिअर मुले मुली १७ व १९ वर्ष वयोगट या स्पर्धांचे आयोजन एस.ए.मिशन हायस्कूलच्या क्रीडांगणावर करण्यात आले असून सदर स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ डि.आर. हायस्कूलचे प्राचार्य पंकज पाठक यांच्या हस्ते  करण्यात आले.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य शुटींगबॉल असोसिएशनचे सचिव के.आर.ठाकरे, एस.ए.मिशन हायस्कूलच्या प्राचार्या नुतनवर्षा वळवी, जिल्हा टेनीक्वाइट संघटनेचे उपाध्यक्ष श्रीराम मोडक, नंदुरबार जिल्हा शुटींगबॉल संघटनेचे अध्यक्ष मिनलकुमार वळवी, जिल्हा सचिव डॉ.मयुर ठाकरे, छत्रपती पुरस्कार प्राप्त शुटींगबॉल खेळाडू अशोक चौधरी, क्रीडाशिक्षक मनीष सनेर, जगदीश वंजारी, भरत चौधरी, प्रा.जितेंद्र माळी, वर्षा पाटील आदी उपस्थित होते. स्पर्धेत राज्यभरातून ४५ संघ नंदुरबार शहरात दाखल झाले होते. या स्पर्धेत सब ज्युनियर मुलांच्या गटात प्रथम विजेता सोलापूर, द्वितीय अहिल्यानगर, तृतीय संभाजीनगर तर मुलींमध्ये प्रथम विजेता धुळे द्वितीय सोलापूर तृतीय अहिल्यानगर तसेच ज्युनियर गटात मुलांमध्ये प्रथम विजेता संभाजीनगर, द्वितीय सोलापूर, तृतीय जळगाव जुनिअर गटात मुलींमध्ये प्रथम विजेता अहिल्यानगर द्वितीय सोलापूर तृतीय कोल्हापूर या संघांनी या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले यावेळी विजेत्या संघांना शुभेच्छा देताना पंकज पाठक यांनी शूटिंग बॉल सारख्या खेळात बालवयात खेळाडू सहभाग नोंदवत आहे ही महत्वपूर्ण बाब आहे अथक परिश्रम व कष्ट असणार्‍या खेळात खेळाडूंचा सहभाग मोठ्या संख्येने असल्यामुळे येणार्‍या काळात या खेळाला  शासन दरबारी सर्व मान्यता मिळेल हे नक्की यासाठी सर्वांनी परिश्रम घ्यावे असे आवाहन पाठक यांनी केले स्पर्धा यशस्वीतेसाठी सतीश सदाराव, आकाश बोडरे, मनीष सनेर, तेजस्विनी चौधरी, रुपेश महाजन, मनीष पाटील, संतोष मराठे, राजेश्वर चौधरी, प्रा.जितेंद्र माळी आदींनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.