राज्याचे मुख्यमंत्री व आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या संकल्पनेतून राज्यभरात संवाद चिमुकल्याची हा अभियान राबवला जात आहे. या अभियाना निमित्ताने शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांनी शासकीय आदिवासी अमोनी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसोबत एक रात्र मुक्काम केला.
आदिवासी आश्रम शाळेत अनेक समस्या आहेत या समस्या दूर करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असून, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना संदर्भात गांभीर्याने विचार करत असून, विद्यार्थ्यांना कुठलाही सुविधांपासून वंचित राहता येऊ नये यासाठी प्रयत्न केला जात असून, त्या निमित्ताने आमदार राजेश पाडवी यांनी गांभीर्य घेत मुलांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अमोनी आश्रम शाळेत जाऊन विद्यार्थ्यांची संवाद साधत एक रात्र मुक्काम केला, यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांची संवाद साधला असता विद्यार्थ्यांनी देखील त्यांच्या विविध समस्या आमदारांना सांगितल्या सोबतच आमदार यांनी शिक्षणासंदर्भात माहिती घेतले आणि विद्यार्थ्यांच्या समस्या तात्काळ दूर करण्यासाठी राजेश पाडवी सकारात्मक असून विद्यार्थ्यांसाठी प्रयत्न करणार आहेत.
राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या संवाद चिमुकल्याची या कार्यक्रमामुळे खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या जाणार असून त्यांच्या भविष्यासाठी हा कार्यक्रम खरंच कौतुकास्पद आहे या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना अनेक चांगल्या गोष्टींच्या बोध घेता येणार असल्याचे आमदार राजेश पाडवी यांनी सांगितले