कोंडाईबारी घाटात सतत होणाऱ्या अपघातामुळे हा घाट अपघात घाट म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. महामार्गाचे चौपदरीकरण होण्याअगोदर या भागात अपघात कमी व्हायचे मात्र यात उलटे झाले महामार्ग झाल्यावर जास्त ज्या ठिकाणी अपघात होऊ लागले आहेत त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. पुन्हा एकदा या घाटात अपघाताची भर पडली त्याचे झाले असे की कोंडाईबारी घाटात अपघाताचा सपाटा सुरूच असून पुढे धावत असलेल्या ट्रकला मागून कंटेनरने धडक दिल्याने मालट्रक महामार्गावर पलटी झाला तर कंटेनर रस्त्याच्या खाली खड्डयात पलटी झाला.
खांबचौदर शिवारात महामार्गावर अपघाताचा होत असतात. त्यामुळे अपघाताचे सत्र केव्हा थांबणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. रोज घाटात अपघात पाहायला मिळतात. दुपारी कोंडाईबारी घाटाच्या खाली महामार्गावर खांबचौदर शिवारात महामार्गावरुन बेंगलोरहून मेहसाणाकडे मिरची घेऊन येणारा मालट्रक क्रमांक जी जे ०५सि यु ५७८६ ला मागुन येणारा रायपुर हुन अहमदाबाद कडे जाणारा कंटेनर क्रमांक जी जे २७ टि डी ३१०७ या कंटेनर च्या ब्रेक फेल झाल्याने पुढे चालत असलेल्या मालट्रकला माघुन धडक देवुन रस्त्याच्या खाली खड्डयात उतरल्याने भिषण अपघात झाला त्यात तीन जण गंभीर जखमी झाले.या अपघाताची माहिती मिळताच 24 तास सेवा देणारी रुग्णवाहिका नाणिजधाम जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थान रुग्णवाहिकेचे पायलट सुरेश वसावे यांच्या मदतीने विसरवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.