दि नवापुर एज्युकेशन सोसायटी संचलित स्व. जमनादास मणिलाल शाह सार्वजनिक गुजराती प्राथमिक शाळा येथे वार्षिक बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी दि नवापूर एज्युकेशन सोसायटीचे संचालक हेमंतभाई शहा होते व प्रमुख पाहुणे म्हणून मोहम्मद भाई मुल्ला, कल्पेश कुमार जोशी, पराग भाई ठक्कर, राजेशभाई अग्रवाल तसेच संस्था संचलित इतर शाळेचे मुख्याध्यापक मिलिंद वाघ, एकताबेन देसाई व पालक गण उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेचे पूजनाने करण्यात आली. नंतर संस्थेचे पदाधिकारी यांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश प्रजापत यांनी केले व सूत्रसंचालन जेनिस सर यांनी केले. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष हेमंत भाई शाह यांनी विद्यार्थ्यांना एक गोष्टीद्वारे अमूल्य मार्गदर्शन केले व सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्याकडून डेरीमिल्क देण्यात आली.