माइंड स्पार्क प्रकल्पामुळे आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये तंत्रज्ञानाची जागृती..
नवापूर प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या धनराट येथील शासकीय आश्रम शाळेत गेल्या 04 वर्षापासून माइंड स्पार्क हा प्रकल्प राबवण्यात येतो. यात विद्यार्थ्यांना मराठी गणित विज्ञान यासारख्या विषयांवर वस्तुनिष्ठ प्रश्नांची श्रृंखला दिली जाते आणि त्या शृंखलेच्या माध्यमातून बरोबर उत्तराला टाळ्या वाजवून उत्कृष्ट म्युझिक दिलेले असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना आनंद होतो. आणि चूक उत्तराला रुसलेला चेहरा समोर येतो. या आनंददायी खेळाच्या माध्यमातून होणाऱ्या शैक्षणिक विकासाला उत्तम चालला मिळत असते. यात सर्व विद्यार्थी अत्यंत आनंदाने सहभागी होत असतात. या प्रकल्पामुळे आदिवासी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून स्वतःचा विकास होण्यासाठी मदत होते असा विश्वास धनराज शासकीय आश्रम शाळेतील मुख्याध्यापक दिलीप गावित यांनी व्यक्त केला. या सर्व प्रकल्पावर माइंड स्पार्क चे समन्वयक अमित भदाणे काम करत आहेत. त्याचप्रमाणे वेगळ्या शाळेंवर वेगवेगळ्या मानधन तत्वावर कर्मचाऱ्यांची देखील नियुक्ती केलेली असते. तसे शाळेतील सर्व शिक्षक देखील या प्रकल्पाला सकारात्मक प्रतिसाद देत विद्यार्थ्यांचा विकासासाठी सतत प्रयत्न करत आहेत. या प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक दिलीप गावीत, अमित गावित, सुरेश गावीत, पुष्पा गावीत, बारकी गावित, संजू गावीत, शामल गावित, अंकिता वळवी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी प्रयत्न करत आहेत.