जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा येथे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न..!!
@विविध शालेय शिक्षणावर आधारित तसेच देशभक्तीपर गीतांसह कौटुंबिक वृद्धाश्रमावर आधारित कार्यक्रमांनी प्रेक्षकांची मने जिंकली..!!
जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा वाघळी येथे नुकताच सांस्कृतिक कार्यक्रमाचा जल्लोष सर्व बालगोपालांनी सादर केला. याप्रसंगी वावे गावातील सर्व गावकरी शालेय परिसरात उपस्थित होते. या कार्यक्रमात विविध देशभक्तीपर गीत, कौटुंबिक समस्यांचे बॅकग्राऊंड म्युझिक देऊन वृद्धाश्रमावरील गीत प्रेक्षकांचे आकर्षण ठरले. विविध आईच्या ममतेवरील गीताने प्रेक्षकांना भावनिक केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रेडेड मुख्याध्यापक कल्पना पाटील, सूत्रसंचालन लता मुलमुले, अर्चना वाघ, कविता पवार यांनी तर आभार लता मुलमले यांनी मानले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी शिक्षण सभापती पोपट भोळे तर प्रमुख अतिथी म्हणून शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हिलाल भोई, विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन दादासाहेब माळी,वाघळी गावाचे प्रथम नागरिक सरपंच द्वारकाबाई धनगर तसेच ग्रामपंचायत सदस्य सुवर्णा माळी,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश भोई तसेच सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रेडड मुख्याध्यापक कल्पना पाटील, लता मुलमुले, केंद्रप्रमुख श्री. दिलीप सैंदानकर, अर्चना वाघ कविता पवार, अनिता पाटील, उर्दू प्राथमिक शाळेतील नवीद अब्दुल गणी,आईशा सिद्धीकिवा, झवेरिया आफरा,कौशल्य विकास योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी जयश्री महाजन तसेच सर्व बालगोपालांनी प्रयत्न केले