गुरु रविदासजी महाराज यांची जयंती व पौर्णिमा निमित्त संकल्प ग्रुप शहादा तर्फे शहादा शहरात ठिकठिकाणी गोमातेसाठी चारा वाटप
February 14, 2025
0
सदर उपक्रम शनी मंदिर, विजयनगर परिसरात राबवण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार संघटनांचे प्रतिनिधी श्री राजेंद्रजी गुप्ता, श्री नरेंद्रजी बागले, श्री नेत्रदीपजी कुवर सर, श्री रुपेशजी जाधव यांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी ग्रुपचे अध्यक्ष श्री सुरेश चव्हाण यांनी सांगितले की वर्षभर प्रत्येक पौर्णिमेला हा उपक्रम सुरळीत सुरू राहील, आणि शहरातील जे गोसेवक सेवा देण्यास इच्छुक असतील त्यांनी पुढच्या पौर्णिमेस उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले. सदर उपक्रमासाठी पिनाकीन पटेल, राकेश कोचर, संदीप बोरसे, पंकज चोरडिया, प्रशांत कदम, संदीप चोरडिया, महेंद्र चित्रकथी,रुपेश अग्रवाल,अमर छाबडीया,कल्पेश खाबिया, महावीर चोरडिया, गुलाब सुतार, छोटू अहिरे आदींनी मेहनत घेतली. सूत्रसंचालन डॉ. लक्ष्मण सोनार यांनी केले