गुजराथ राज्यातील सागबारा येथील देवमोगरा मातेची याञेसाठी नवापूर शहरातून भाविक रवाना..
February 21, 2025
0
नवापूर-नवापूर देवमोगरा पदयाञा समिती तर्फे साला बादा प्रमाणे गुजराथ राज्यातील सागबारा येथील देवमोगरा मातेची याञेसाठी भाविक रवाना झाले आहे.शहरातील श्रीराम मंदीरा जवळुन देवमोगरा मातेची मुर्तीचे विद्यवंत पुजन पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत,उपनिरीक्षक विशाल सोनवणे,सेवानिवृत पोलिस निरीक्षक अजय वसावे व नवापूर देवमोगरा पदयाञी समितीचे पदधिकारी ,नागेश्वर महादेव मंदीर,सोन्या मारोती मंदीराचे पदधिकारी यांनी केली या नंतर देवमोगरा याञे कडे भाविक रवाना झाले जलो बुलावा आया हे माताने बुलाया हे अशा घोषणा देत पदयाञा श्रीराम मंदीर गल्ली,सरदार चौक,लिमडावाडी,नारायनपुर रोड ,खाबदा, पाचंबा,डोगेगाव,खांडबारा,धानोरा या मार्गाने गुजराथ राज्यातील सागबारा येथील देवमोगरा येथे यामोगी मातेचा याञेसाठी रवाना झाले आहे.नवापूर शहरातील देवमोगरा पदयाञा समिती दरवर्षी या याञेचे नियोजन करत असतात या याञेचे हे ११ वर्ष आहे.या प्रसंगी देवमोगरा पदयाञा समितीचे पदधिकारी जितेंद्र अहिरे,राकेश सोनार यांनी आपले मनोगत व्यक्त केले