विसरवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस रात्री गस्त घालत असताना खांडबारा डोगेगाव रस्त्यावर मारुती ब्रेझा वाहनात देशी, विदेशी मधसाठा भरुन अवैध रित्या गुजरात राज्यात विक्रीसाठी घेवुन जात असताना वाहनात सह एकुण दहा लाख ऐशी हजाराचा मधसाठा जप्त करण्यात आल्याची मोठी दबंग कारवाई करण्यात आली आहे... रात्रीच्या वेळी विसरवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील, पो.कॉ. लिनेश पाडवी,सांगळे, चालक कौतीक कोकणी,बोरसे हे खांडबारा ते डोगेगाव रस्त्यावर गस्त घालत असताना या रस्त्यावरुन गुजरात राज्या कडे जाणारी मारुती ब्रेझा क्रमांक जी.जे.26 ए.बी. 8405 या वाहनाला पोलिसांनी चौकशी साठी थांबवली असता चालकाने अंधाराचा फायदा घेत पळ काढला यावेळी पोलिसांना शंका आल्याने वाहनाची डिक्की उघडून पाहिले असता त्यात देशी दारुचे 45 खोके ,टेंगो पंच चे दोन खोके, मँकडॉर नंबर वन चे दोन बॉक्स, डि एस पी ब्लॅक चे 48 नग . एकुण किमत एक लाख ऐशी हजाराचा मधसाठा आणी वाहनाची किमत 9 लाख रुपये असे एकुण दहा लाख ऐंशी हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वाहन चालक हा विनापरवाना मधसाठा वाहनात भरुन अवैधरित्या गुजरात राज्यात रात्रीच्या वेळी छुप्या मार्गाने विक्री साठी घेवुन जात होता ,रात्री विसरवाडी पोलिसांनी केलेल्या मोठी कारवाई मुळे अवैध मध विक्री करण्यांचे धाबे दणाणले आहेत....विसरवाडीहून समीर पठाण