Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

आर्टीका पोलवर आदळलीनंदुरबारात युवक जागीच ठार- चार जखमी

 पहाटेच्या सुमारास महादेवाच्या मंदिरात भजन, किर्तनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या आर्टीगा गाडीचा अपघात झाला. या अपघातात १८ वर्षीय युवक गंभीर जखमी होवून जागीच ठार झाला. तसेच गाडीतील इतर चार जण जखमी झाले असून ही घटना नंदुरबार शहरातील खोडाई माता मंदिराजवळ घडली. भरधाव गाडी विद्युत पोलवर आदळली गेल्याने अपघात घडला आहे.
नगरात राहणारे नंदुरबार शहरातील मोईन हितेश कांतीलाल ईशी, कुंभारवाडा भागात राहणारा हर्षल रविंद्र मराठे, गांधी नगरातील नितेश मनोज पवार, जाणता राजा चौकातील रोशन संतोष नवसारे व नंदुरबार तालुक्यातील बालअमराई येथील अविनाश युवराज देशमुख हे पाचही भाविक जगतापवाडी
परिसरातील डुबकेश्वर महादेव मंदिरात पहाटे चार वाजेच्या सुमारास भजन व किर्तन करण्यासाठी आर्टिका गाडी ए. जे. ७१५४) जात होते. यावेळी महाराणा प्रताप पुतळ्याकडून जगतापवाडीतील डुबकेश्वर महादेव मंदिराकडे जात असतांना पहाटे चार वाजेच्या सुमारास भरधाव वेगातील अगा गाडी खोडाई माता मंदिरापुढे असलेल्या रस्त्यावरील विद्युत पोलवर या जावून आदळली.अपघातात वाहनामध्ये बसलेला हर्षल रविंद्र मराठे (वय १८, रा. कुंभारवाडा नंदुरबार ) हा युवक गंभीर जखमी झाल्याने जागीच ठार झाला. तसेच अविनाश युवराज देशमुख, नितेश मनोज पवार, हितेश कांतीलाल ईशी, रोशन‌ संतोष नवसारे हे चार जण
जखमी झाले. अपघातामध्ये वाहनांचेही नुकसान झाले आहे. याबाबत रोशन संतोष नवसारे यांनी नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.‌त्यानुसार गाडी चालक हितेश कांतीलाल ईशी याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास असई विनोदकुमार गोसावी करीत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.