Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

वन हक्कासाठी एक पाऊल पुढे-जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली एकूण 232 दाव्यांची सुनावणी झाली.

वनहक्कासाठी एक ठोस पाऊल !

आज अक्कलकुवा तहसील कार्यालय येथे जिल्हास्तरीय वनहक्क समितीच्या वतीने अपील दाव्यांवर महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली एकूण 232 दाव्यांची सुनावणी झाली.
या सुनावणीला उपवनसंरक्षक लक्ष्मण पाटील (तळोदा), सदस्य सचिव चंद्रकांत पवार, तहसीलदार विनायक घुमरे, जिल्हा समन्वयक हर्षल सोनार, सहाय्यक रोशन चौरे, तसेच उपविभागीय सहाय्यक रोशनी बहिरम यांची उपस्थिती लाभली.

दावेदार नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या मागण्या संयमाने ऐकून घेतल्या गेल्या, आणि योग्य तो निर्णय घेण्यासाठी सकारात्मक पावले उचलण्यात आली.

वनहक्कासाठी दावा करणाऱ्या नागरिकांसाठी ही सुनावणी आशेचा किरण ठरली आहे.

#वनहक्क #ForestRights #Akkalkuwa #Nandurbar #सुनावणी #जिल्हाधिकारी #जनतेचा_हक्क

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.