आज टोकरतलाव गावात जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार यांनी अंगणवाडी केंद्रांना प्रत्यक्ष भेट देत, तेथील सेवा, सुविधा आणि लाभार्थ्यांच्या गरजा जाणून घेतल्या.बालविकास प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका व सेविका यांच्याशी सखोल संवाद साधून गुणवत्तापूर्ण सेवा देण्यावर भर दिला.
त्याचप्रमाणे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना प्रोत्साहन दिलं, तर ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांशी संवादातून गावाच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने पुढचं पाऊल टाकलं.
एक सकारात्मक पाऊल… ग्रामीण भागाच्या उज्वल भविष्याकडे..!