शहादा तालुक्यातील मोहिदे येथील एकलव्य मॉडर्न स्कूल, 8 वी च्या वर्गात शिकणारीमोहिदे विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या- पालक व नातेवाईकांच्या आक्रोश...
आदिवासी विकास विभागातील शहादा तालुक्यातील मोहिदे येथील एकलव्य मॉडर्न स्कूल, 8 वी च्या वर्गात शिकणारी तेरा वर्षीय विद्यार्थिनीचे शाळेतच गळफास घेऊन आत्महत्या,
शाळेच्या इमारतीचे काम सुरू असल्याकारणाने ही शाळा शहादा तालुक्यातील सुलतानपूर आश्रम शाळेचे आवारात भरत होती, या ठिकाणी मुलींच्या वस्तीगृहात एका खोलीत या विद्यार्थिनीने स्वतःला ओडणीला साह्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे. मयत विद्यार्थिनी ही धडगाव तालुक्यातील अट्टी या गावाची मूळ रहिवासी असून, सकाळी तिच्या मैत्रिणींनी रूम उघडल्यानंतर हा प्रकार समोर आला. या घटनेनंतर पालकांनी आश्रम शाळेचे आवारातच आक्रोश करत संबंधित व्यवस्थापकीयांवर संताप व्यक्त केला. घटनेनंतर शाळेत आमदार राजेश पाडवी व पोलीस प्रशासन आदिवासी विकास विभागाचे अधिकारी आश्रम शाळेवर दाखल झाले. या घटने प्रकरणी तीन सदस्य चौकशी समिती नेमण्याची मागणी आमदार राजेश हळवी यांनी केली आहे. संबंधित वॉर्डन मुख्याध्यापक यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत मुलीचे प्रेत नेणार नाहीची भूमिका पालकांनी व नातेवाईकांनी घेतली होती. याप्रकरणी तीन सदस्य चौकशी समिती देण्याचे आश्वासन प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांनी दिले. या आत्महत्या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी व नातवाईकांनी शाळे वर संशय व्यक्त केला आहे. मुलीचा मृत्यू देह म्हसावद ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदना साठी पाठवण्यात आला असून, म्हसावद पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे... शहादा तालुका प्रतिनिधी कैलास सोनवणे