Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

पुन्हा अपघात- धुळे सुरत महामार्गावर निमदर्डा गावाच्या फाट्याजवळ ट्रक व मोटरसायकल अपघातात मोटर सायकलस्वार ठार

धुळे सुरत महामार्गावर अपघात थांबणार तरी कधी..? अपघात सत्र थांबायला तयार नाही अपघात रोखण्यासाठी कोणतीही उपाययोजना नाही..!
पुन्हा अपघात- धुळे सुरत महामार्गावर निमदर्डा गावाच्या फाट्याजवळ ट्रक व मोटरसायकल अपघातात मोटर सायकलस्वार ठार

नवापूर प्रतिनिधी
कोंडाईबारी घाट व धुळे सुरत महामार्गावर अपघात ही नित्याचे झाले आहे. दररोज अपघाताचे सत्र सूरुच असून अपघात सत्र थांबायला तयार नाही. अपघात सत्र 2024 मध्येही सुरू होते आणि 2025 मध्ये ही कायम आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात  येत आहे मात्र अपघात रोखण्यासाठी ठेकेदार व प्रशासनामार्फत कोणी‌ही उपाय योजना होत नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. दोन-चार दिवसापूर्वी या मार्गावर अपघात घडले आजचा पुन्हा अपघात झाला असून यात मोटरसायकल स्वार गंभीर होऊन ठार झाला आहे. त्याचे झाले असे की धुळे सुरत महामार्गावर निमदर्डा गावाच्या फाट्याजवळ ट्रक व मोटरसायकल यांच्या झालेल्या अपघातात एक जण ठार झाल्याची घटना घडली आहे. 
धुळे सुरत महामार्गावर  संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास निमदर्डा गावाच्या फाट्याजवळ नवापूरहून धुळेच्या दिशेने धावणारा ट्रक (क्रमांक जी जे 05 बीटी1336) व मोटरसायकल (क्रमांक एम एच 39 एके 66 56) यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात मोटार सायकलस्वार सुरूपसिंग पातळ्या गावित 55 रा उचीशेवडी ता नवापूर  मयत झाला. त्यात डोक्याला जबर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला.अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज नाणीजधाम या विनामूल्य सेवा देणाऱ्या रुग्णवाहिकेच्या  साहाय्याने विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु दुचाकीस्वार सुरूपसिंग पातळ्या गावित यांना डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाला .घटनास्थळी विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, हे कॉ अरुण कोकणी, पो कॉ पिंटू पावरा, राजू कोकणी, प्रकाश अहिरे, मनिंदर नाईक यांनी भेट देऊन दोघे वाहने ताब्यात घेतले या अपघाताबाबत विसरवाडी पोलीस ठाण्यात नोंद  झाली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.