नवापूर महाराष्ट्र स्टेट ट्राम्सपोर्ट कामगार संघटना तर्फे नवापूर एस टी आगाराचा प्रवेश व्दाराजवळ निदर्शन आंदोलन करण्यात आले.राज्यभर निदर्शन आंदोलन करण्यात आले आहे.
नवापूर एस टी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना तर्फे हे आंदोलन १६ मागण्या बाबत सकाळी ११ वाजता नवापूर एस टी आगार विभागाचा प्रवेश व्दार जवळ घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले यात एस टी चालक,वाहक,याञीक कर्मचारी,एस टीचे प्रशासकीय कर्मचारी या आंदोलना मध्ये सहभागी झाले होते त्यांचा मागण्या ०१/०४/२०२० ते ३१/०३/२०२४ या कालावधीत देय होणारी थकबाकी त्वरीत अदा करा. सन २०१८ ची महागाई भत्त्याची थकबाकी कामगारांना अदा करण्याचा मा. न्यायालयाच्या आदेशाची त्वरित अंमलबजावणी करा.सन २०१६ ते २०२० या कालावधीसाठी एकतर्फी जाहीर केलेली वेतन वाढ यातील मान्य केल्याप्रमाणे घरभाडे भत्त्याचा दर ८, १६, २४ टक्के करुन थकबाकी त्वरित अदा करा.सन २०१६ ते २०२० या कालावधीसाठी एकतर्फी जाहीर केलेली वेतन वाढ यातील वार्षिक वेतन वाढीचा दर एकतर्फी १ टक्क्याने कमी केलेला होता तो पुर्वलक्षीप्रमाणे ३% करुन त्याची थकबाकी त्वरित द्या, सर्व देय थकबाकी रकमेच्या अधिन राहून कामगारांना सध्या मिळत असलेली वाढीव थकबाकी रक्कम पूर्वीप्रमाणे माहे मार्च २०२५ पासून पूढे तशीच सुरु ठेवा,शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे रा. प. कामगारांचा महागाई भत्ता ५३ टक्के करुन थकबाकीसह त्वरित द्या., भविष्य निर्वाह निधीच्या खात्यातून कामगारांच्या मागणीनूसार त्वरित उचल द्या,प्रवासीभाडे वाढ पूर्वीप्रमाणे ५ रुपयांच्या पटीत करून सुधारित भाडे करा, अन्यायकारक शिस्त व आवेदन पध्दत रद्द करून नविन सुधारित शिस्त आवेदन पध्दत तयार करून लागु करा,कोरोना कालावधीत कामगारांचे घेतलेले रजेचे अर्ज रद्द करून त्यांना एल.डी.पी. (लॉकडाऊन हजेरी) लावून त्यांची रजा त्यांच्या खात्यावर वर्ग (संचित) करा, बारा महिन्यात चालवण्यात येणाऱ्या रा.प. नियतांची सरासरी विचारात घेऊन कामगारांना समय वेतनश्रेणीवर (आर.टी.एस.) घेण्याचे मान्य केल्याप्रमाणे परिपत्रीय सूचना (आदेश) काढा व अंमलबजावणी करा, मल्टीट्रेड बाबत मा.महाव्यवस्थापक यांच्याकडून मान्य केल्याप्रमाणे यांच्या समवेत रा.प. प्रशासन व संघटना प्रतिनीधी यांच्या त्वरित बैठक घेऊन तोडगा काढा, आर.टी.ओ. विभागाकडून होणारी दंडात्मक कारवाई चालकांच्या पगार खात्यातून वसूल करणे मान्य केल्याप्रमाणे त्वरित बंद करा,खात्यांतर्गत उत्तीर्ण झालेल्या कामगारांना बढत्या देतांना प्रथम बदली अर्जानूसार बदल्या देऊन उर्वरित रिक्त जागांवर बदल्या द्या, कार्यशाळा कर्मचाऱ्यांची कमतरता भरून काढा,कार्यशाळेला स्पेअर पार्ट पुरवठा करा अशा १६ मागण्या बाबत एस टी चे महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेने आंदोलना मध्ये संघटचे अध्यक्ष फजल शेख, सचिव संजय शिंदे,कार्यध्यक्ष गजमल बहिरम,खजिदार विनोद राठोड,रमीज राजा,खंडु गरगरे,अनिल कोळी,
चंद्रकात सांळुखे,रहीम शेख,सतिष वळवी,योसिफ कुंवर,प्रकाश भंदाणे,तरुन गावीत,आर एम वसावे,
विशाल पाटील,वामन भोहे,नरेश वळवी,हरसिंग मोरे,अशोक वसावे,राजेंद्र पारधी,रविंद्र मराठे,निलेश गावीत,मसुर वाडेकर,संदिप ब्राम्हणे,आसिफ अली आदी आंदोलना मध्ये सहभागी होऊन निदर्शनं आंदोलन केले