अतिक्रमण धारकांना वारंवार नोटीसा देवून ही त्याकडे दुर्लक्ष अखेर अतिक्रमण निर्मूलन मोहिम राबविण्यात येत आहे..!!
शहादा शहरात आज पासून शहादा नगरपालीकेने अतिक्रमणांवर हातोडा चालविण्यास सुरुवात झाली असून अतिक्रमणाच्या वेळखा असलेल्या भाग श्वास घेण्यास मोकळा झाला आहे. अतिक्रमणावर हातोडा चालत असल्याने याबाबत समाधान व्यक्त होत आहे.
शहादा शहरातील बस स्टॅड परिसराला मोठ्या प्रमाणात अतिक्रमणाचा विळाखा पडला होता. त्यामुळे याठिकाणी रस्ता अरुंद होवून अपघात होत होते, वाहतुकीस अडथळे निर्माण होत होते . या बाबात अतिक्रमण धारकांना वारंवार नोटीसा देवून ही त्याकडे दुर्लक्ष केल्या जात असल्याने शहादा नगरपालीकेने अखेर आज अतिक्रमण निर्मुलन मोहीम राबवत बस स्टॅड परिसरातील अनधिकृत बॅनर तसेच डोंगरगाव रोड वरील अतिक्रमीत टपऱ्या काढण्यास सुरुवात केली असून काही अतिक्रमण काढले तर काही अतिक्रमण जसे तसे आहे.शहरातील पूर्ण अतिक्रमण काढण्यात येणार का याकडे शहर वशियांचे लक्ष लागून आहे. या अतिक्रमण निर्मूलन मोहिमे मुळे अतिक्रमण धारकांचे धाबे चांगलेच दणदणले आहे. यावेळी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी सह नागपालिकेचे पथक व पोलीस निरीक्षक सह पोलिसांच्या मोठा पोस्ट फाटा यावेळी उपस्थित होता......
शहादा तालुका प्रतिनिधी कैलास सोनवणे संपर्क 📞 8888112766