नंदुरबारमध्ये दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणाऱया तब्बल चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. नंदुरबार शहर पोलीस स्टेशन अंतर्गत तीन तर उपनगर पोलीस स्टेशन अंतर्गत एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यातील एक आरोपी हा अल्पवयीन आहे. त्यामुळेच या घटनापाहता नंदुरबार पोलीसांनी अशा पोस्ट व्हायरल करु पाहणाऱयांना तंबी दिली आहे. अशा पोस्ट ग्रुपमध्ये व्हायरल झाल्यास ग्रुप अँडमीनवर पण गुन्हा दाखल करण्याचे संकेकत पोलीस अधिक्षक नंदुरबार यांनी दिले आहे.