Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

प्रभाकर कॉलनीतील श्री.ओंकारेश्वर महादेव मंदीर व याहामोगी भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

नवापूर शहरातील प्रभाकर कॉलनी, यमुनाबाई नगर, सुभाष नगर यांच्या संयुक्त विद्यमाने देणगी व वर्गणी गोळा करून आकर्षक आणि सुंदर असे श्री ओंकारेश्वर,महादेव व याहामोगी माता मंदीर उभारणी करण्यात आले आहे.
मूर्ती ठेवून व महिला कळसधारी घेऊन वाजतगाजत मिरवणूक सकाळी ७ वाजता रथातून देव देवतांच्या आणि दिव्य रांगोळ्यांची आरास करण्यात आली होती. कॉलनीतील प्रत्येक गल्लीत महिलांनी भव्य १३ यजमानांच्या हस्ते होम हवन व विधीवत पूजा करून संध्याकाळी 5.30 वाजता प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. भगवान महादेवाची आरती व याहामोगी माता आरती करण्यात आली यावेळी रजनीताई नाईक. भरत गावीत धनंजय गावीत, हेमलता पाटील, अजय पाटील, राजेश गावीत, सुधीर निकम,रमेश मावची उपस्थित होते. मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला. संध्याकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत महा प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सर्व शिवभक्तांनी आणि याहामोगी माता भक्तांनी दर्शनाच्या व महा प्रसादाच्या लाभ घेतला.प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्नते साठी समितीचे अध्यक्ष डॉ.विनू वसावे, समिती सदस्य,महिला, बंधू भगिनी आणि विशेष तरुण युवा, बालगोपाळ यांनी प्रयत्न केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.