नवापूर प्रतिनिधी- ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त टीम ट्रस्ट खा.प्रा.शाळा झामणझर व ग्रामपंचायत झामणझर यांच्या संयुक्त विद्यमाने झामणझर येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्या जबना अशोक मावची होत्या.तर प्रमुख पाहुणे सरपंच आदरणीय पौलस कुंवर ,संस्थेचे सुपरवायझर सुधीर कोल्हे ,उपसरपंच ईसाक मावची, केंद्राचे केंद्रप्रमुख रामू कोकणी ,ग्रामपंचायत सदस्य अल्पेश मावची,दानियल मावची ,रजनी मावची,ग्रामसेविका कोमल गावीत,भारती वडनेरे,रावसाहेब पाटील,श्री सावळे उपस्थित होते
सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते रिबीन कट करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर सर्व मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. शाळेकडून सर्व मातांचा सत्कार करण्यात आला. व गिफ्ट देण्यात आले.विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.सरपंच पौलस कुंवर यांनी गावातील विकास कामाविषयी माहिती दिली. व शाळेविषयी समाधान व्यक्त केले. तसेच ग्रामपंचायत सदस्य अल्पेश मावची यांनी गावातील शाळा कशा जगतील याविषयी मार्गदर्शन केले.ग्रामपंचायत च्या वतीने महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. बीपी, शुगर, शुगर ब्लड तपासणी करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्र येथील अधिकारी डॉ. निलीमा गावीत यांनी स्री आरोग्य बाबत मार्गदर्शन केले वेळीच तपासणी केली तर कँन्सर सारख्या आजारावर मात करू शकतो.ग्रामसेविका कोमल गावित यांनी कोणीही शाळाबाह्य राहणार नाही व गावाविषयी जागरूक राहणे. याविषयी मार्गदर्शन केले .तसेच महिलांचा आनंद मेळावा घेण्यात आला .ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व विद्यार्थ्यीनींना sanitory pad व महिलांना स्टीलचे ट्रे वाटप करण्यात आले.सर्वांना चविष्ट भोजन देण्यात आले.
शाळेचे मुख्याध्यापक प्रविण राजभोज यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. सुत्रसंचालन वैशाली गवळे यांनी केले.कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी मेहनत घेतली