मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'सीएम डॅशबोर्ड' संकेतस्थळ आणि 'स्वॅस' माहिती प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला. शासनाच्या सर्व विभागांची माहिती जनतेला 'सीएम डॅश बोर्डवर' लवकरच उपलब्ध होईल यामध्ये न्यायालय, रेरा तसेच कायदा व सुव्यवस्था या सेवांचाही समावेश करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
माहिती तंत्रज्ञान विभागांतर्गत राष्ट्रीय सूचना केंद्राच्या 'स्वॅस' (S३WaaS) या प्रणालीमध्ये राज्यातील ३४ संकेतस्थळांचा समावेश आहे. इतर विभागांच्या संकेतस्थळांचाही समावेश वाढवा. ही प्रणाली सुरक्षित व सहजरित्या एकाच ठिकाणी उपलब्ध असून स्मार्ट फोन व संगणकावरही उपलब्ध होणार आहे.- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
विधानभवन येथे ‘सीएम डॅशबोर्ड’ सादरीकरणासंदर्भात आयोजित बैठकीला माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार, मुख्यमंत्र्याचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन-नैनुटिया, सचिव डॉ.श्रीकर परदेशी, संचालक अनिल भंडारी यासह आयटी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.