नवापूर प्रतिनिधी-
नवापूर शहरातील अनेक भागात कुठेही हात गाडी व दुकाने लावण्यावर नवापूर नगरपालिकेने पाऊल उचलून त्या हटवून रस्ता मोकळा केला आहे. शहरातील लाईट बाजार व मेन रोडवर कुठेही दुकान लावून असणाऱ्या लहान मोठ्या व्यापाऱ्यांना सूचना देत त्या हटवण्यात आले आहेत त्यामुळे रस्ता मोकळा झाला हात गाडी कुठेही मध्यभागी लावणा यांना चाप दिला आहे. मेन रोड व लाईट बाजार येथे असणाऱ्या व्यापाऱ्यां च्या दुकानासमोरच लोरी लावत असल्यामुळे व्यापाऱ्यांनी संताप व तक्रार व्यक्त केली होती.
नवापूर नगरपालिकेने ट्राफिक समस्यांसाठी पाऊल उचलल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे ही कारवाई तात्पुरती न राहता ती कायमस्वरूपी असावी अशी ही प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली. ट्रॅफिक समस्येवर नगरपालिकेने गंभीर होणे तेवढेच गरजेचे आहे.नवापूर शहरात नवापूर नगरपालिकेने हातगाडी,व रस्त्यावर लागत असलेले भाजीपाला टोल लावुन ट्रॉफीकला अडथळा करणा-यावर नवापूर नगरपालिकेचे बांधकाम विभागाने त्यांना सुचना देऊन हटविण्यात आले आहे.सविस्तर वृत असे की नवापूर शहरात दिवसेन दिवस वाढत्या वाहणाची संख्या पहाता त्यात हातगाडीवाले वाहणाना अडथळा करत असतात त्यामुळे ट्रॉफीकची समस्या दिवसेन दिवस वाढत असतांना नवापूर नगरपालिकेने रस्त्यावरील भाजीपाला विक्रीते यांनी लावले रस्त्यावरील टोपले तसेच हातगाड्या हटविण्याचा सुचना दिल्या आहे.त्यांनी या सुचनाचे पालन केले नाही तर कायदेशीर कार्यवाही करण्याचा पण सुचना बांधकाम अभियंता विवेक भामरे,लिपिक कमलेश महाले यांच्या पथकाने दिले आहे शहरातील लाईट बाजार,नगरपालिका कार्यालय समोरील भाजी विक्रीते यांना या बाबद सुचना दिल्या आहेत.शहरात आज सकाळ पासुन नवापूर नगरपालिकेन ही मोहीम हाती घेऊन रस्ते मोकळे केले आहेत