Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

युवा साहित्यिक स्वप्निल खामकर यांची लंडनमधील आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी निवड- छडवेलच्या इतिहास मध्ये अजून एक सन्मान

नवापूर प्रतिनिधी--
 युवा साहित्यिक स्वप्निल खामकर यांची लंडनमधील ग्रे’स इन येथे २४-२५ एप्रिल २०२५ रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी निवड झाली आहे.

ही प्रतिष्ठित परिषद महाराष्ट्र शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (BARTI), पुणे, मुंबई विद्यापीठ आणि ग्रे’स इन, यूके यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली जाते. या परिषदेत डॉ. आंबेडकर यांच्या कायद्याशी संबंधित योगदान, सामाजिक न्यायाची कल्पना, आणि आर्थिक धोरणांवर चर्चा केली जाणार आहे, विशेषतः त्यांच्या लंडनमधील शिक्षणाचा प्रभाव या विषयावर भर दिला जाणार आहे.
स्वप्निल खामकर यांच्या निवडीमुळे अहमदनगर आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. या परिषदेत जगभरातील शास्त्रज्ञ, अभ्यासक, धोरणकर्ते आणि कायदेतज्ज्ञ सहभागी होणार आहेत. प्रमुख चर्चेचे विषय आंबेडकरांचे कायदेशीर योगदान, समावेशक विकास, सामाजिक न्याय चळवळी, आणि आजच्या काळातील त्यांचे विचार किती लागू आहेत, यावर आधारित असणार आहेत.
या निवडीबद्दल आनंद व्यक्त करताना खामकर म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक न्याय व समानतेच्या क्षेत्रात दिलेले योगदान अमूल्य आहे. ज्या ठिकाणी त्यांनी शिक्षण घेतले, तिथे जाऊन त्यांच्या विचारांवर चर्चा करण्याची संधी मिळणे, ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि जबाबदारीची बाब आहे.”
उद्योजकता विकास, युवक सशक्तीकरण आणि सामाजिक न्याय क्षेत्रात कार्यरत असलेल्या खामकर यांच्या सहभागामुळे या चर्चांमध्ये मौल्यवान योगदान होणार आहे.ही परिषद डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रे’स इन मधून ‘बार-अ‍ॅट-लॉ’ झाल्याच्या १०० वर्षांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित केली आहे आणि त्यांच्या मानवाधिकार, लोकशाही, आणि आर्थिक समतेवरील जागतिक प्रभावाला अधोरेखित करते.लंडन येथील आंतरराष्ट्रीय संमेलनात निवड झाल्याने सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट साहेब, उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेब,वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे साहेब, तसेच अहिल्यानगर शहराचे आमदार संग्रामभैया जगताप व चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीस  शुभेच्छा दिल्यात.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.