महामार्गावर लागोपाठ दुसरा अपघात-अपघात रोखण्यासाठी कोणतीही उपाययोजना नाहीच..!
@ धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर सोनखांब जवळ माल ट्रक पलटला एक गंभीर जखमी...!!
नवापूर शहर व गाव पाड्यांमध्ये होळी उत्सव सुरू असताना महामार्गावर अपघात घडत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. महामार्गावर गेल्या दोन दिवसापासून लागोपाठ अपघात सत्र सुरू असून महामार्गावर अपघात रोखण्यासाठी अद्याप पर्यंत कोणतीही उपायोजना करण्यात येत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे लागोपाठ अपघात झाल्या ची घटना ताजी असताना नवापूर तालुक्यातील सोनखांब येथे धुळे सुरत महामार्गावर साक्री कडून नवापूरच्या दिशेने चुना भरून धावणारा ट्रक पलटी झाल्याने चालक गंभीर जखमी झाला आहे त्याला विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नवापूर तालुक्यातील सोनखांब येथे साखरी कडून नवापूरच्या दिशेने ट्रक क्रमांक जी जे 19 एक्स 62 77 हा चुना भरून भरधाव वेगाने जात असताना चालकाचा सोनखांब शिवारात वाहनावरील ताबा सुटल्यामुळे ट्रक रस्त्याच्यामधोमध पलटी झाला. हा अपघात शुक्रवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडला. या अपघातात ट्रकचालक मसतूक रमजान अली वय 35 रा दिल्लीपुर उत्तर प्रदेश हा गंभीर जखमी झाला असून त्यास विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ट्रक मधोमध पलटी झाल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती.घटनेची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस ठाण्याची सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे हे कर्मचाऱ्यांसह दाखल झाले. विसरवाडीहून विशेष प्रतिनिधी