@ सारंगपूर येथे दर्शनासाठी सायकलवर जाण्याचे हे दुसरे वर्ष.. युवकांमध्ये मोठा उत्साह..!!
सारंगपूर हे भारताच्या गुजरात राज्यातील बोटाड जिल्ह्यातील एक गाव आहे. सारंगपूर हे गावातील ऐतिहासिक श्री कष्टभंजन हनुमानजी मंदिर आणि BAPS स्वामीनारायण मंदिरासाठी भारतभर ओळखले जाते. अहमदाबाद जिल्ह्याच्या सीमेवर सुमारे 3000 लोकसंख्येचे गाव आहे. जवळचे शहर बोताड आहे. गाव सुमारे 153 किमी आहे. महाराष्ट्र व गुजरात सीमेवरील नवापूर शहरातून व तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर भाविक व त्यात युवा वर्ग दर्शनासाठी दरवर्षी जात असतात त्या अनुषंगाने नवापूर शहरातुन गुजराथ राज्यातील सारंगपुर येथे पाच भाविक सायकलीवर रवाना झाले आहे.गुजराथ राज्यातील सारंगपुर येथील हनुमानजी मंदीर आहे हे मंदीर गुजराथ मधील जागृत देवस्थान असुन याठिकाणी भारतातुन अनेक भाविक येत असतात. नवापूर शहरातील लिंमडावाडी भागातील हनुमानजी मंदीराची विद्यीवंत पुजन करुन भाविक बंटी चंदलानी माजी नगरसेवक,बंटी शर्मा,निलेश चंदलानी,जयराम आयुजा,सेवाभावी दिपेश वर्मा,हरीष अग्रवाल आदी सायकलीने गुजराथ राज्यातील सारंगपुर येथे रवाना झाले आहे या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते शंकर दर्जी,विजय सैन,सिंधी समाजाचे अध्यक्ष राजकुमार गेही,मयुर सिंधी,गोपी सैन,सप्नील सैन,हेमंत शर्मा,सोनु दर्जी आदीनी त्यांच्या शालश्रीफळ देऊन सत्कार करत शुभेच्छा दिल्या या पाच भाविकांचे सायकलीवर जाण्याचे दुसरे वर्ष आहे.