Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

नंदुरबारात युवा सेनेच्या मेळावा; पदाधिकाऱ्यांनी केले मार्गदर्शनयुवा सैनिकांनी कॉमन मॅन म्हणून काम करावं-कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक

नंदुरबार (प्रतिनिधी)-शिवसेनेच्या प्रचार- प्रसार व सरकारच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी युवा सेनेची राज्यात 10 पथकं तयार करण्यात आली आहेत. जनतेसाठी  युवा सैनिकांनी कॉमन मॅन म्हणून काम करावं असा मोलाच्या सल्ला  शिंदे गटाच्या युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

सध्या राज्यभरात शिवसेना शिंदे गटाच्या 'युवा विजय महाराष्ट्र दौरा' सुरू असून, शहरात छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात रविवारी दुपारी युवा सैनिकांच्या मेळावा घेण्यात आला. यावेळी राज्य कार्याध्यक्ष पूर्वेश प्रताप सरनाईक यांनी उपस्थित युवकांना मार्गदर्शन केले. ते पुढे म्हणाले,ग्रामीण भागासह तळागाळातील जनतेची कामे करून देणे हे प्रत्येक शिवसैनिकाच काम आहे. जिल्ह्यात शिवसेनेचे काम चांगलं सुरू असून,शिवसेनेच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांमुळे युवा सैनिकांमध्ये ताकद निर्माण होत आहे. गेल्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र घडवायचे काम केले. शिवसेना अधिकाधिक भक्कम करण्यासाठी शिवसैनिकांनी प्रयत्न करावेत. जनतेसाठी शिवसैनिकांनी कॉमन मॅन म्हणून काम केलं पाहिजे. प्रास्ताविक जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांनी केले.

संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी म्हणाले आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या मुद्द्यावर हात घातला. युवा सेनेच्या प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षाचं काम उभारीने करावं. प्रत्येकाने आपापली गाव सांभाळलं पाहिजे. विरोधकांचे उमेदवार ठरले गेले असतील त्याची चिंता शिवसैनिकांची करायची नाही.

आ.आमश्या पाडवी म्हणाले, आगामी काळात नगरपालिका,जिल्हा परिषद,ग्रामपंचायत त्याचप्रमाणे विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येतील. या निवडणुकांमध्ये शिवसैनिकांनी आपल्या पक्षाची  ताकद दाखवायची आहे.युवा सेना मुख्य सचिव राहुल लोंढे म्हणाले, नंदुरबारला लागून असलेल्या गुजरात व मध्ये प्रदेश सीमेलगत देखील शिवसैनिकांनी शिवसेनेचे कार्य त्या ठिकाणी पोचवले पाहिजे. धाव पातळीवर संघटना वाढवण्याचे काम शिवसैनिकांनी करावे.


यावेळी राज्य सचिव किरण साळी, सचिव, राज्य अविष्कार भुसे, युवासेना विद्यापीठ व कॉलेज कक्ष निरीक्षक प्रथमेश पाटील, राज्य सदस्य किशोर भोसले, राज्य सदस्य निखिल चौधरी, युवती सेना राज्य  सदस्य योगिता ठाकरे, श्वेता सुयोग, जि.प माजी अध्यक्ष वकील पाटील, माजी नगरसेवक किरण रघुवंशी, यशवर्धन, कुणाल वसावे रघुवंशी,धडगाव अक्कलकुवा विभाग युवासेना जिल्हाप्रमुख योगेश पाटील, नंदुरबार विभाग युवा सेना प्रमुख प्रेम सोनार, जिल्हा समन्वयक दीपक मराठे, जिल्हा संघटक विजय पाडवी, तालुकाप्रमुख राजेश वसावे, जिल्हा संघटक कमलेश महाले, महानगरप्रमुख बंटी सूळ, उपजिल्हा संघटक चंद्रकांत पाटील, युती सेना जिल्हाप्रमुख राजश्री मराठे,नितीन नागरे, मोहित राजपूत, प्रतीक पटेल, अजय नाईक, दुर्गेश शिरसाठ, विशाल पाटील प्रफुल्ल खैरनार, पं.स माजी उपसभापती  प्रल्हाद राठोड,संतोष साबळे, बाजार समिती संचालक किशोर पाटील आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.