सायकल चालवणे आपल्या स्वतःच्या हृदयासाठी आणि प्रफुल्लित मनासाठी अत्यंत लाभकारी..
श्रीमती निलीमा नितीनकुमार माळी.--पदवीधर शिक्षिका.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पळाशी तालुका सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजी नगर.
पूर्वीपासून आपल्या डोळ्यासमोर असणारी आणि आता सद्यस्थितीमध्ये कुठेतरी अडगळीत पडलेली सायकल ही सद्यस्थितीमध्ये नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. परंतु सायकल आपल्या आयुष्याला प्रसन्नतेकडे आणि आयुष्य चांगले राहण्यासाठी मदत करते हे मात्र सद्यस्थितीमध्ये आपण विसरलो आहोत. दैनंदिन जीवनामध्ये सर्वसामान्य कोणत्याही वयाच्या माणसांना निर्माण होणारे विविध विकार म्हणजेच मधुमेह अति लठ्ठपणा हृदयविकार यासारख्या आजारांवर रामबाण उपाय म्हणजे सायकल चालवणे होय.दररोज किमान पाच ते आठ किलोमीटर सायकल चालवल्याने हृदयविकार, मधुमेह आणि लठ्ठपणासारख्या आजारांपासून संरक्षण मिळण्यास मदत होते, तसेच मानसिक तणाव कमी होतो आणि वजन कमी करण्यासही मदत होते.
_________________
सायकल चालवण्याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. माझ्या घरापासून नवापूर या शहरात मी काम करत असलेली शाळा दोन किलोमीटर होती. दररोज मला सकाळी 9 ते 01 आणि दुपारी 04 ते 06 असे दोन वेळा ग्रंथपालची ड्युटी करावी लागायची. मी दररोज 8 किलोमीटर सायकल चालवून कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता. मला लोक काय म्हणतील? याचा विचार न करता सतत मी सायकल वर ड्युटी करत राहीली.मला काही महिला हसतही होत्या. सरांना पैसे नसतील तर हप्त्याने गाडी घ्यायला सांगा.. असे म्हणून सुद्धा हिणवत होत्या.बऱ्याचदा मला मजाक मध्ये बोलताना खिल्ली सुद्धा उडवायच्या. परंतु या सर्व गोष्टीला मी कधी जुमानले नाही. माझ्या आरोग्यासाठी आणि माझ्या प्रफुल्लित मनासाठी सायकल महत्त्वाची आहे म्हणून सायकल चालवणे हा उत्तम पर्याय डोळ्यासमोर ठेवला. आणि सायकल सुमारे चार वर्षे चालवत राहिली. सायकल चालवताना कुठल्याही प्रकारची अभिलाषा न बाळगता अभिमानाने आणि स्वाभिमानाने स्वतःच्या शरीरासाठी चालवली. आणि सायकल चालवण्याचे फायदे माझ्या स्वतःच्या आयुष्यात मला सकारात्मक रित्या जाणवू लागले. त्यामुळे मला दिवसभर काम केल्यानंतर कधीही थकवा जाणवला नाही प्रचंड ऊर्जा आणि स्फूर्ती प्रत्येक कामामध्ये मला मिळत होती.नवापूर येथील जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त शिक्षक तसेच आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री विक्रम गोपाळ पाटील हे 80 वर्षाची असून सुद्धा आजही सायकल चालवतात. त्यांचा आदर्श घेऊन मी देखील माझ्या आयुष्यामध्ये अशाच प्रकारची सायकल चालवणे असा संकल्प केला. त्यांनी दिलेला मोलाचा संदेश हा माझ्यासाठी आयुष्यभराची शिदोरी राहिली.
_______________________
🤷♂️ *सायकल चालवल्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या जीवनात होणारे फायदे*🤷♂️
1. स्वतःच्याहृदयविकाराचे संरक्षण: बऱ्याचदा सायकल चालवल्याने सायकलीचा आणि हृदयाचा काय संबंध असे बरेच निरर्थक प्रश्न सर्वसामान्य समाजात विचारत असतात परंतु नियमित सायकल चालवल्याने हृदयाचे स्नायू मजबूत होतात आणि रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो. म्हणून आपल्या आयुष्यात हृदयविकारासारख्या यादी जडू नये असं वाटत असेल तर सायकल विकत घेऊन नक्की चालवावी.
2. स्वतःचे वजन कमी करण्यास मदत: अवजड शरीर झाल्यानंतर आपल्याला स्वतःला आपले शरीर हे ओझे वाटायला त्यावेळी सायकलिंग एक उत्तम व्यायाम आहे, ज्यामुळे कॅलरीज बर्न होतात आणि वजन कमी करण्यास मदत होते. सायकलिंग करत असताना आपल्या संपूर्ण शरीराची हालचाल होऊन शरीरातील घाम बाहेर पडण्यास मदत होते. आणि आपल्या शरीरातील कॅलरीज बर्न होतात. ही क्रिया आपलं वजन कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते म्हणून सायकल चालवणे खूप गरजेचे आहे.
3. मधुमेह सारख्या आजारावर मात:
दैनंदिन जीवनामध्ये जवळपास 80% पेक्षा जास्त लोकांना मधुमेहाचा धोका सध्याच्या परिस्थितीत जाणवायला लागलेला आहे. मधुमेह हा अनेक विकारांना आमंत्रण देणारा प्राथमिक रोग समजला जातो. नियमित सायकल चालवल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते आणि टाईप 2 मधुमेह होण्याचा धोका कमी होतो. परंतु सायकल आपण आनंदाने चालवायला घेतली तर कुठल्याही प्रकारे ताण निर्माण होत नाही आणि मधुमेहाचा धोका सुद्धा दूर होतो.
4. समाजात लाज वाटेल असा लठ्ठपणा कमी: बऱ्याचदा अत्यंत लहान वयामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये लठ्ठपणा ही समस्या प्रकर्षाने जाणवत आणि खरे सांगायचे म्हटले म्हणजे वयाच्या चाळीशी नंतर अनेकांना खूप वजन वाढल्याच्या तसेच अति लठ्ठपणाच्या तक्रारी जाणवायला परंतु अति लठ्ठपणाला घाबरून न जाता सायकलिंगमुळे चरबी कमी होते आणि स्नायू मजबूत होतात, ज्यामुळे लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते. म्हणून सायकल चालवण्यामध्ये सातत्यता अत्यंत महत्त्वाची आहे. यासाठी वयाचा कुठलाही प्रकारे बंधन नाही. मी माझ्या डोळ्याने बघितलेले 82 वर्षाचे नवापूरचे विक्रम गोपाळ पाटील काका सेवानिवृत्त शिक्षक असताना सुद्धा सायकल चालवायचे. आणि त्यामुळे मला त्यांच्यापासून सायकल चालवण्याला प्रेरणा मिळाली.
5.स्नायू बळकट आणि मजबूत होतात: सायकल चालवल्याने प्रत्येक स्नायूंपैकी विशेष म्हणजे पाय आणि मांड्यांचे हालचाल आकुंचन प्रसारण सतत सुरू असते त्यामुळे स्नायू मजबूत होतात. म्हणून सायकल चालवताना आपल्या शरीराला उत्तम प्रकारे सुडौलता प्राप्त करण्यासाठी सुद्धा सायकल चालवणे गरजेचे आहे.
6. अवयवांमध्ये संतुलन आणि समन्वय सुधारतो: बऱ्याचदा थोडं वय झाल्यानंतर आपल्या शरीरातील विविध अवयवांचा समन्वय राहत नाही किंवा संतुलन योग्य प्रकारात साधता येत नाही. त्यामुळे सर्व अवयवांचे व्यवस्थित संतुलन आणि अवयवांचे प्रत्यक्ष कृतीमधील समन्वय हा सायकल चालवण्यामुळे व्यवस्थित करता सायकल चालवण्यामध्ये समन्वय आणि संतुलन आवश्यक असते, त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा याचा खूप फरक पडत असतो.
7 मानसिक तणाव कमी होतो: सायकल चालवल्यामुळे मानसिकरित्या सुद्धा आपल्याला रिलॅक्सेशन मिळण्यासाठी सायकलिंग करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.सायकलिंगमुळे शरीरात एंडोर्फिन नावाचे हार्मोन तयार होते, ज्यामुळे तणाव कमी होतो आणि मूड सुधारतो. प्रत्येक कृतीमध्ये आपल्याला वैचारिकता वाढवण्यासाठी आणि 24 तास आपल्या कामांची वेग वाढवून स्फूर्ती निर्माण करण्यासाठी इंडोफिन नावाचा सराव आपल्या शरीरात श्रवणे गरजेचे असते त्यामुळे मानसिक ताण सहज घालवता येतो.
8 जीवनातील नैराश्य कमी होते: बरेचदा आपल्याला आलेला तानाचे विस्थापन कसे करावे हे समजत नाही म्हणून बरेच लोक आपला आलेला ताण हा विविध वस्तूंवर किंवा व्यक्तींवर काढत परंतु त्यामधून कुठल्याही प्रकारे आपला ताण विस्थापन होत परंतु त्याचे रूपांतर आपण सायकलिंग करून आपल्याला आलेला ताण घालवता आला तर किती चांगले म्हणून नियमित सायकलिंगमुळे नैराश्य आणि चिंता कमी होण्यास मदत होते. यासाठी दररोज सकाळ संध्याकाळी जसा वेळ मिळेल तसा सायकलिंग केली तर आपले आरोग्य सुधारून नैराश्य कमी होते.
9.मानसिक आरोग्य सुधारते: सध्याच्या परिस्थितीत तंदुरुस्त दिसणारे लोक सुद्धा मनाने खूप दुबळे होत फक्त आभासी दुनिया मध्ये आपल्या जवळ असलेला पैसा आयुष आरामाच्या असणाऱ्या सुख सुविधांच्या संदर्भात विचार करून स्वतःला खूपच श्रीमंत समजायला परंतु ते खऱ्या अर्थाने मानसिक दुबळे असतात. हेच त्यांना मुळात कळत नाही.सायकलिंगमुळे मेंदूला ऑक्सिजन मिळतो, ज्यामुळे स्मरणशक्ती आणि विचार प्रक्रियेत सुधारणा होते. आपल्या स्वतःचे मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी सायकल चालवणे हा उत्तम पर्याय आहे.
10. पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लागतो: सध्याच्या परिस्थितीत अत्यंत कमी खर्चात आणि सहज उपलब्ध होईल असं दुचाकी वाहन म्हणजे सायकल होय.सायकल चालवल्याने प्रदूषण कमी होते आणि पर्यावरणाची काळजी घेता येते. त्यामुळे पर्यावरण राखण्यास आपल्या स्वतःकडून थोडीफार तरी मदत होईल जेणेकरून भविष्यातील पिढ्या कृतज्ञतेने आपल्याकडे बघतील.
11. या कृतीसाठी अत्यंत कमी खर्च लागतो: सायकल विकत घेतल्यानंतर शक्यतोवर अत्यंत अल्प दरात सायकलीचा मेंटेनन्स आपल्याला बघता येतो. खूप खर्चिक नसल्यामुळे आपल्याला कमी खर्चात आपल्या आरोग्यासाठी उत्तम साधन म्हणून सायकल कडे बघायला हरकत नाही. सायकल चालवण्यावर फार खर्च येत नाही, त्यामुळे ते बजेट-फ्रेंडली आहे. म्हणून या दृष्टिकोनातून विचार केला असता प्रत्येक घरामध्ये सायकल असणे आजच्या काळाची गरज आहे.
12. यामुळे पर्यटनाची आवड निर्माण होते: सायकलिंगमुळे नवीन आणि अनोळखी ठिकाणी फिरता येते. जर हौशी व्यक्ती असतील किंवा जोडीदार असतील तर नवनवीन ठिकाणी सायकलीवर फिरून आपला विरंगुळा होऊन आपले आरोग्य देखील चांगले सांभाळता येईल. तसेच ग्रामीण भागातील कुशल कामगारांना रोजगार सुद्धा आपल्या माध्यमातून प्राप्त होईल. कारण अनेक गावांमध्ये सायकल सुधारणार माणसं असून त्यांनी स्वतःची दुकाने बंद केली आहेत. कारण सध्या परिस्थितीमध्ये सायकलिंग चे प्रमाण खूप कमी झाले आहे. कुणीही सायकल घेऊन चालवताना दिसत नाही. काही ठराविक बोटावर मोजणारे लोक आपण बघितले तर ती आरोग्याच्या संदर्भात थोडे जागृत होऊन सायकल विकत घेऊन चालवत आहेत. परंतु अद्यापही गरिबातला गरीब माणूस सुद्धा कमी पैशात सायकल विकत घेऊन आपल्या आरोग्याची काळजी घेऊ शकतो. अति सुखवासी आयुष्य असणारे किंवा बैठे काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने सायकल विकत घेऊन यासाठी आपल्या स्वतःच्या मनाची तयारी करून दररोज वेळ मिळेल तेव्हा सायकल चालवली तर आपल्या स्वतःचे आरोग्य व्यवस्थित सांभाळून मानसिक शांतता देखील स्वतःला प्राप्त करता येते. तसेच सायकलिंग मुळे अत्यंत गोड साखर झोप लागून आयुष्यातला पूर्ण ताण हा कायमचा नष्ट होऊ शकतो.
थोडक्यात सायकलिंग करणे हे अत्यंत गरिबीचे लक्षण नसून,आपल्या स्वतःच्या शरीरासाठी आपल्या आरोग्यासाठी आणि प्रफुल्लित मनासाठी सायकलिंग करणे ही काळाची गरज आहे. यामुळे आपले आरोग्य सुधारेल. कारण सध्या परिस्थितीमध्ये शरीर संपदा ही सर्वात महत्त्वाची आणि मोलाची संपदा मांडली जाते. आयुष्यभर निरोगी राहणे यालाच खऱ्या अर्थाने श्रीमंत माणूस म्हटले जाते. अन्यथा निरर्थक गोष्टी मागे लागून स्वतःचा ताण वाढवून निरर्थक संपत्ती निर्माण करण्याच्या कल सध्या परिस्थितीमध्ये दिसत आहे. पण याही पलीकडे निरोगी स्वतःच्या आयुष्यासाठी आपल्याला चांगले जगता येईल का या संदर्भात जर विचार करणार असाल तर आजच कोणत्याही कंपनीची सायकल विकत घेऊन स्वतःच्या शरीरासाठी किमान पाच ते आठ किलोमीटर सायकल चालवता येईल अशा पद्धतीने आपण प्रयत्न करायला हरकत नाही. यासाठी पर्यावरणाची ही मदत होईल आणि आपल्या स्वतःच्या शरीराला सुद्धा प्रसन्नता वाटेल. म्हणून आपल्या सर्वांना या लेखाच्या माध्यमातून विनंती करेल की आपलं शरीर आणि मन प्रफुल्लित ठेवण्यासाठी सकाळी किंवा संध्याकाळी एक विशिष्ट वेळ काढून नक्की सायकलिंगचा वापर करावा जेणेकरून आपलं स्वतःचं आरोग्य व्यवस्थित राहील.
या चिंतन मांडणाऱ्या लेखिका आजही वयाच्या 35 नंतर स्वतः दररोज 05 ते 08 किलोमीटर सायकल चालवतात. त्या स्वतः योग व निसर्गोपचार तज्ञ असून सध्या जळगाव विद्यापीठात मानसशास्त्र या विषयात पीएच डी करीत आहेत.