जलजीवन मिशन योजने अंतर्गत गावात पाईप लाईनचे काम निष्कृष्ट दर्जाचे सुरु
March 06, 2025
0
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील पिंपर्डे गावातील जनतेचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार याकरिता पिंपर्डे गावात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वकांशी योजनेतून म्हणजे जल जीवन मिशन योजनेतून कोठ्यावधी निधी मंजूर झाला. यामुळे कामे दर्जेदार व टिकाऊ होतील अशी अपेक्षा गावाकऱ्यांना होती. पण पिंपर्डे गावात जल जीवन मिशन अंतर्गत गाव अंतर्गत पाईप लाईन चे काम निष्कृष्ट दर्जेचे सुरु असून पाईप लाईन चे काम जमिनी मध्ये तीन फूट तरी खोल असावे असे आदेश असताना देखील गावात पाईपलाईन जमिनीत फक्त एक फुटाच्या आत खोल होत आहे.. तर काही भागात पाईप लाईन एक फुटाच्या अंतरावर असल्यामुळे वाहन येजा करतांना पाईप लाईन ला गळती लागत असून लीक होत आहे. ठेकेदार मार्फत काम थातूर मातुर करून पूर्ण प्रयत्न केला जात आहे. गाव अंतर्गत पाईपलाईन चे साहित्य निष्कृष्ट दर्जेचे असून भविष्यात पाईपलाईन ठीक ठिकाणी लीक झाल्यास त्याचा खर्चाचा भार ग्रामपंचायतीवर पडणार यात मात्र शंका नाही. काम कसे सुरु आहे हे बघण्यासाठी इंजिनिअर गावात फिरकले नाही यामुळे ठेकेदार आपल्या मनमानीपणे निष्कृष्ट दर्जाचे काम करत आहे. इंजिनिअर व ठेकेदार यांच्या संगनमतांनी बोगस काम सुरु असल्याचे दिसून येत आहे.जल जीवन कामाचा केंद्रीय पथका कडून तपासणी व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.. संबंधित ठेकेदार मार्फत जल जीवन मिशन चे काम संत गतीने सुरु असून लवकरच आमदार राजेश पाडवी यांना सदरील ठेकेदारची तक्रार गावकरी करणार असल्याची माहिती मिळाली आहे... शहादा तालुका प्रतिनिधी कैलास सोनवणे