नवापूर शहरात होळी मोठया उत्सवात साजरा करण्यात आला शहरातील श्री व्दारकेश्वर महादेव मंदीरात मुख्य होळीचे विधिवत पुजन व आरती करुन मंदीराचा आवारात होळी पेटविण्यात आली.
नवापूर प्रतिनिधी
व्दारकेश्वर महादेव मंदीराचा आवारात माजी जि प अध्यक्ष भरत गावीत व माजी जि प महिला बालकल्याण सभापती संगिता गावीत यांच्या हस्ते होळी मातेचे विधीवत पुजन करुन होळी पेटविण्यात आली शहरात सर्व प्रथम व्दारकेश्वर महादेव मंदीराचा आवारात पहिले होळी पेटविण्यात येते. या मुख्य होळीचे पूजन व पेटवल्यानंतर होळीतून युवक मशाल पेटवुन पळत जाऊन ते आपापल्या परिसरातील होळी पेटवतात. ही जुनी पंरपरा असुन ती आज पावेतो सुरु आहे.शहरातील शास्त्रीनगर, मंगलदास पार्क, स्वामी समर्थ केंद्र परिसर,सराफ गल्ली,श्री दत्त मंदीरा समोरील होळी,सरदार चौक होळी,टरनल प्लॉट भागातील होळी, कुंभारवाडा परिसर,महात्मा गांधी समोरील होळी,देवळफळी भागातील होळी,कलाल गल्ली भागातील होळी असे सर्व मिळुन २० होळी पेटविण्यात आल्या.होळी उत्सवाची आदिवासी गावपाड्यांमध्ये धूम असते.. होळी उत्सवानिमित्त बाजारपेठ गर्दीने फुलली असून विविध भागात नागरीक होळी मातेचे पुजन करतांना दिसत होते. धुलीवंदन पण लहान गोपाल मंडळी मोठया उत्सहात साजरा करता दिसत होते.शहरातील बाजारात होळी उत्सवात लागणारे साहित्य खरेदीसाठी भाविकांनी गर्दी केली होती नवापूर तालुक्यात होळी उत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात येत असतो हा उत्सव तालुक्यात ५ दिवस सुरु राहणार आहे.