ग्रामीण भागातील खंडित विज पुरवठा सुरळीत व्हावा या मागणी करिता शिवसेना उबाठा पक्षामार्फत टाळे ठोको आंदोलन व ठिय्या आंदोलन करण्यात आले मात्र वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांचा लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
जिल्हयातील ग्रामिण भागात खंडीत विज पुरवठा सुरळीत व्हावा या मागणी करिता शिवसेना उबाठा पक्षामार्फत आज साडेअकरा वाजेच्या सुमारास मार्केट यार्ड समोरील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात टाळे ठोको व ठिय्या आंदोलन जिल्हाप्रमुख अरुण चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी पदाधिकारी,शेतकरी व शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी आंदोलकांनी घोषणा देऊन आंदोलन केले दरम्यान कार्यकारी अभियंता यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी व ग्रामीण भागातील नागरिकांना विजेच्या पुरवठा वारंवार खंडित होतो तो पूर्ववत सुरू व्हावा या मागणी करिता शिवसेना उबाठा पक्षामार्फत तीन मार्च रोजी वीज वितरण कंपनीचा विभागीय कार्यालयात टाळे ठोको आंदोलन करण्यात येणार आहे त्या संदर्भात वीज वितरण कंपनी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले होते. आंदोलनाच्या वेळी जिल्हाप्रमुख अरुण चौधरी, महानगरप्रमुख पंडित माळी, उपजिल्हाप्रमुख अर्जुन मराठे , वाहतूक सेना जिल्हा उपाध्यक्ष छोटू चौधरी, जिल्हा सचिव दिनेश भोये, सोशल मीडिया प्रमुख आनंदा पाटील, युवा सेना शहर समन्वयक अक्षय श्रीखंडे, उपतालुकाप्रमुख बापू राजपूत, उपतालुकाप्रमुख सुनील पवार, शहर उपप्रमुख एजाज काझी ,उपतालुकाप्रमुख निंबा पाटील, संतोष पाटील, उत्तम भुरसे, कैलास बिल मंगल मायले, गणेश पाटील, संतोष पाटील, आकाश वळवी, आभेसिंग वळवी, गुड्डू राठोड उपस्थित होते.