नवापूर तालुक्यातील आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत असलेल्या बंधारे येथील आश्रमशाळेच्या 13 विद्यार्थ्यांना मधमाश्यांचा हल्ला.जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू
नवापूर प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत असलेल्या बंधारे येथील शासकीय आश्रमशाळेतील 13 विद्यार्थ्यांना मधमाश्यांनी चावा घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे......
बंधारे येथील शासकीय आश्रमशाळेतील इयत्ता दुसरी ते सहावीत शिक्षण घेणारे 7 ते 12 वयोगटातील विद्यार्थ्यी संध्याकाळी सहा वाजता शाळेच्या माघील बाजुला खेळत होते शाळेतील एका खिडकीला मधमाश्यांचे मोठे पोळे लागले होते विद्यार्थी खेळत असतांना अचानक मधमाश्यां उडाल्या आणी विद्यार्थी ना चावा घेण्यास सुरुवात केली
यावेळी विद्यार्थ्यांनी मोठमोठ्यात आरोळाओरोळा केला त्यांचे आवाज ऐकून शालेय आधिक्षक शिक्षक धावत आले असता एकुण 13 विद्यार्थ्यांना मधमाश्यांनी चावा घेतल्याने त्यांची घाबरलेली अवस्था झाली होती
सर्व विद्यार्थ्यांना रिक्षात टाकून विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र यातील तीन विद्यार्थ्यांना उलटी मळमळ चा त्रास होवु लागल्याने त्यांना तातडीने 108 रुग्णवाहिकेच्या मदतीने नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.. दहा विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याने त्यांना ओषध उपचार करून रवाना करण्यात आले....
यावेळी विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे,पोलीस उप.नि.किरण पाटील ,पो.कॉ निखिल ठाकरे ,लिनेश पाडवी यांनी दवाखान्यात विद्यार्थ्यांची भेट घेतली.