सोशल डेव्हलपमेंट फाउंडेशन नवापूर चे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत नगराळे व आंबेडकरी जनतेच्या वतीने ख्यातनाम गायिका भाग्यश्री इंगळे यांचे प्रबोधनात्मक भीम गीतांचा कार्यक्रम उत्साहात
नवापूर येथे महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने ख्यातनाम गायिका भाग्यश्री इंगळे यांचे प्रबोधनात्मक भीम गीतांचा कार्यक्रमाचे आयोजन सोशल डेव्हलपमेंट फाउंडेशन नवापूर चे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत नगराळे व आंबेडकरी जनतेच्या वतीने करण्यात आले होते.सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन व डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन माजी जि प अध्यक्षा रजनीताई नाईक,माजी नगराध्यक्ष गिरीष गावीत,
दामूआण्णा बि-हाडे,उमराण ग्रामविकास संस्था सचिव दिपक वसावे,माजी नगरसेवक चंद्रकांत नगराळे,प्रकाश पाटील,अजय पाटील,महेंद्र नगराळे,छोटु अहिरे, शंकर दर्जी,डॉ अर्चना नगराळे,सविता नगराळे,अँड अक्षदा चंद्रकात नगराळे,रेखा चंद्रकांत नगराळे, उत्सव समितीचे अध्यक्षा सुनिता अमृतसागर सोनवणे,अँड राहुल शिरसाठ,डॉ बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती अध्यक्ष जयेंद्र चव्हाण,जितेंद्र अहिरे,आकाश गावीत,विजय तिजविज,चुनिलाल पवार,सुनिल वाघ,आदीनी केले.यानंतर प्रास्ताविकातून चंद्रकांत नगराळे यांनी सोशल डेव्हलपमेंट फाउंडेशन चा उद्देश हा महापुरुषांच्या विचारांची ज्योत मनामनात लावण्याचा हा अल्पसा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे,आणि भविष्यात संस्था अशाच प्रकारचे प्रबोधनात्मक विचार पेरण्याचे काम करत राहील अशी त्यांनी ग्वाही दिली.यानंतर भाग्यश्री इंगळे यांनी आपल्या सुमधुर व पहाडी आवाजाने सर्वांची मने जिंकून घेतली.कार्यक्रमाला सर्वच स्तरातील मान्यवर व मोठ्या संख्येने स्त्री वर्ग उपस्थित होता.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. सुधीर त्रिभुवन तर आभार प्रदर्शन एडवोकेट राहुल शिरसाठ यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नटु नगराळे,विकी साळवे,विशाल वाडेकर,सिध्दु शिरसाठ,बंटी वाघ,सुमित पवार,गोरख नगराळे,दर्पण नगराळे,कैलास शिरसाठ आदीनी परीश्रम घेतले.